शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा : नाईक

By admin | Updated: April 21, 2015 01:39 IST

मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील

मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील कोणतीच विकासकामे करण्यास सरकारला अपयश आल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु, भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत गोव्यात अनेक विकासकामे केली आहेत. काँग्रेस पक्षाने येत्या निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्री कोण ते जाहीर करावे, असे आव्हान भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी दिले आहे.मडगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दामोदर नाईक म्हणाले, भाजप सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जी आश्वासने जाहीरनाम्यात दिली होती त्यातील ७० ते ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. भाजपने गेल्या तीन वर्षांत कालवी पूल पूर्ण केला आहे. सध्या मांडवी नदीवरील नव्या पुलाचे काम सुरू आहे. पणजी येथे १०० कोटी खर्चून पार्किंग प्लाझा बांधण्यात आला असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. अनेक ठिकाणी चारपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. खांडेपार पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे.ओल्ड गोवा रस्त्याचे रुंदीकरण, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत युवतींना लाभ, गृह आधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात दरमहा रक्कम जमा केली जात आहे. विरोधक केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच काँगे्रस पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)