शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील घटनेचा काँग्रेसकडून निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:53 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा अवमान केल्या प्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कृतीचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

म्हापसा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा अवमान केल्या प्रकरणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कृतीचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. म्हापशातील गांधी चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करुन हा निषेध करण्यात आला. 

उत्तर प्रदेशात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतिने महात्मा गांधीच्या प्रतिमेचा अवमान करताना नथुराम गोडसेंचा उदात्तीकरण करण्याची पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यात येत असला तरी गांधीजींचे विचार, अहिंसेची शिकवण, त्यांनी देशासाठी केलेला त्याग, दिलेले बलिदान लोकांच्या मनातून काढले जाऊ शकत नसल्याचे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी प्रदेश महिला अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रवक्ता अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस तसेच इतर विविध आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना घटनेचा निषेध केला. तसेच या प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यास केंद्राला आलेल्या अपयशाचा सुद्धा त्यांनी निषेध केला. केंद्रात असलेल्या भाजपच्या समर्थनामुळे  हिंसेवर विश्वास ठेवणा-या भाजपा सरकारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोपही यावेळी बोलताना केला. घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे आरोपही यावेळी त्यांनी केले.  

घडलेला प्रकार हा निंदनीय असून गांधीजींचे विचार आजही देशात कायम असल्याचे तसेच राहणार असल्याचे झालेल्या प्रकारातून सिद्ध होत असल्याचे अमरनाथ पणजीकर म्हणाले. झालेल्या या प्रकारातून नव्या पिढी समोर कोणता आदर्श ठेवला जातो असा प्रश्न आमदार हळर्णकर यांनी केला. देशात घडलेला हा लाजीरवाणा प्रकार असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी यांचे समर्थन करणा-या घोषणा दिल्या. तसेच केंद्र सरकारचा निषेध करणारी घोषणाबाजी केली. 

टॅग्स :goaगोवा