शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी काँग्रेस करणार खुर्ची आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:15 IST

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हापसा शहरातील लोकांना उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन काँग्रेस पक्षाने खुर्ची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हापसा : उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हापसा शहरातील लोकांना उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन काँग्रेस पक्षाने खुर्ची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘काम करा अथवा खुर्ची घेऊन घरी आराम करा’ असा सल्ला काँग्रेस आंदोलनातून देणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाने पुढील दोन दिवसात पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाºयांना आराम खुर्च्या भेट स्वरुपात दिल्या जातील अशी माहिती काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी दिली.   

शहरातील लोकांना मागील दहा दिवसांपासून पाण्यापासून वंचित रहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांना होणाºया त्रासाला खात्याचे अधिकारी कारणीभूत असल्याने आपल्या कार्यालयात बसून आराम करण्यापेक्षा या अधिकाºयांना खुर्च्या भेट देऊन घरी बसण्याचा सल्ला आंदोलनातून देणार असल्याचे भिके पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

शहराला होणारा पाणी पुरवठा इतरत्र वळवण्यात येत असल्याचा आरोप भिके यांनी करुन पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा पुरवठा हॉटेल्ससाठी करण्यात येत असून सामान्य लोकांच्या हितावर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हॉटेलच्या पाण्याच्या मीटरची तपासणी करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.   

सरकार लोकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष झाले असल्याने मागील १० दिवसापासून लोकांना पाणी मिळणे कठिण झाले असल्याचे भिके म्हणाले. म्हापशाचे आमदार तथा शहर विकासमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी या मुद्यावरुन खात्याच्या पाणी विभागावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्यांनी मोर्चा नेला तर लोकांच्या हितासाठी काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसोझा यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन त्यांना सरकारात कोणते स्थान आहे हे स्पष्ट होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भिके यांनी उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावरही टिका केली. म्हापशातील लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत:कडे येण्याचा सल्ला देणाºया लोबो यांनी सल्ला देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा अशी मागणी केली. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वत: म्हापसा शहरातील असून तेच स्वत: या शहराला सावत्र वागणूक देऊ लागले असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुदीन नाईक यांनी केला. शहराला पाणी मिळत नाही व दुसºया बाजूने मुख्यमंत्री म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्यासाठी सरसावले आहेत. यातून आपले मुख्यमंत्री तसेच सरकार किती कार्यक्षम आहेत हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.