शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

संरक्षणमंत्री म्हणून अनेक परिस्थितींशी सामना

By admin | Updated: January 11, 2015 02:01 IST

मनोहर पर्रीकर : काणकोणात लोकोत्सवाला प्रारंभ

खोतीगाव : देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी आपल्यावर दिली गेली तेव्हापासून संरक्षणासाठी कधी हसावे लागते, कधी रडण्याची, तर कधी गप्प राहण्याची वेळ येते, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. लोकोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्रीकर बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या लोकोत्सवाचे शुभारंभ झाला. याप्रसंगी कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार गणेश गावकर, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, शिक्षणतज्ज्ञ सुभाष वेलिंगकर, काणकोणातील सर्व पंचायतीचे सरपंच उपस्थित होते. मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. विनाकारण विरोधक काहीही बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री मांद्रेकर म्हणाले की, अनेक उत्सवासाठी खर्च करून संस्कृतीचे जतन करणे आणि कलाकारांना मानधन वाढविणे काळाची गरज आहे. जे कोणी विपरीत बोलतात त्यांच्याकडे लक्ष न देता संस्कृती जतन करण्याचे काम करणाऱ्यांनी चांगल्या कार्यात सतत कार्यदक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला गाव आदर्श बनवायचा आहे. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येकांना नोकरी, असा आपला संकल्प आहे. लोकोत्सवातून सुदृढता निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे आपल्या मंत्री तवडकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात स्पष्ट केले. दत्ता वेळीप, संजय कोमरपंत, जानू तवडकर, दामोदर वेळीप, श्रीकांत तवडकर यांनी स्वागत केले. या वेळी दया गावकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या प्रमुख ठिकाणीच खास मातीची दिवली (दीपमाळ) उभारण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या देशपातळीवरील निवडीकरिता विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री पार्सेकर व मंत्री मांद्रेकर यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या विकासासाठी नाताळाच्या सुट्टीत मौज न करता मुलांनी जमविलेला निधीचा धनादेश मुख्याध्यापिका सविता तवडकर यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, सरपंच मीना गावकर, महेश नाईक, भूषण प्रभुगावकर, देवेंद्र तवडकर, जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप, सरपंच उमेश वेळीप, बालभवन अध्यक्ष कुंदा चोडणकर, स्थानिक पंच जगदीश तवडकर व इतर सहकारी उपस्थित होते. रूपा च्यारी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)