शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा सभात्याग

By admin | Updated: July 29, 2016 02:07 IST

पणजी : कॅसिनो हटविण्याच्या प्रश्नावर कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्री देऊ न शकल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ करीत सभात्याग केला.

पणजी : कॅसिनो हटविण्याच्या प्रश्नावर कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्री देऊ न शकल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ करीत सभात्याग केला. गृह खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला मुख्यमंत्री रात्री नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उत्तर देत असताना वातावरण तापले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह दोन काँग्रेसचे आमदार व दोन अपक्ष आमदारांनी सभात्याग केला. रायबंदर येथे सलीम अली अभयारण्याजवळ मांडवीत ठेवलेला कॅसिनो कधी हटविणार? पंचतारांकित हॉटेलांमधील कॅसिनोंना परवाने बंद करणार की नाही? बांबोळी येथे पंचतारांकित हॉटेलात कॅसिनोसाठी दिलेला परवाना, या प्रश्नांवर आमदार रोहन खंवटे यांनी सरकावर तोफ डागली. काही आमदार कॅसिनोच्या प्रश्नावर दबावतंत्र वापरत आहेत. या आमदारांचे कोणाकडे व्यवहार आहेत, हे आपल्याला माहीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले, तेव्हा खंवटे, आमदार नरेश सावळ, आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व राणे या पाच जणांनी सभात्याग केला. कॅसिनोंवर कायद्याने निर्बंध घालता येणार नाही. शुल्कवाढ करून किंवा अन्य मार्गाने आळा घालता येईल. गावागावांत पंचतारांकित हॉटेल्स येत असल्याने तेथे कॅसिनो येत असतील, तर कायद्यात दुरुस्तीही करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)