शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

१२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गोवंश कत्तलीस सशर्त परवानगी

By admin | Updated: September 19, 2014 01:44 IST

हायकोर्टाचा निर्णय : सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा राष्ट्रीय गोरक्षा सेनेचा निर्धार

पणजी : बकरी ईदसाठी १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गोवंश कत्तलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त परवानगी दिली असून राष्ट्रीय गोरक्षा सेना त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. बकरी ईदसाठी राज्यात ठिकाठिकाणी बैल, तसेच अन्य गोवंश हत्येला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारतीय मुस्लिम जमात संघटनेने हायकोर्टात सादर केली होती त्यास हरकत घेत गोरक्षा अभियानचे हनुमंत परब यांनी हस्तक्षेप याचिका गुदरली. या प्रकरणी गुरुवारी सुनावणीच्यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोवंश हत्येसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी केली. गोवा मांस प्रकल्पात कत्तलीच्यावेळी सीसीटीव्ही कार्यरत असावा, तसेच अन्य शर्थी आहेत. सरकारवर टीकेची झोड दरम्यान, गोरक्षा अभियानने सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारने याबाबत घेतलेल्या बोटचेप्या धोरणावर कडक टीका केली. पर्रीकर सरकार अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करीत आहे, असा आरोप राष्ट्रीय गोरक्षा सेनेचे अध्यक्ष आशु मोंगिया यांनी केला. ईदच्या दिवशी कुर्बानी देणे हा मुस्लिमांचा हक्क नव्हे, असा निवाडा १९९४ साली पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध आशुतोष प्रकरणात झालेला आहे. तसेच गुजरातच्या एका प्रकरणातही अशाच प्रकारचा निवाडा झालेला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कमलेश बांदेकर म्हणाले की, सरकारने घेतलेली भूमिका धक्कादायक असून अपेक्षाभंग केलेला आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. हस्तक्षेप याचिका सादर केलेले राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या गो विभागाचे मोहम्मद फैज खान म्हणाले की, इस्मालमध्ये कुर्बानी सक्तीची नाहीच उलट इतरांचे मन दुखावेल असे काही करू नका, असा संदेश कुराणातून दिला जातो. गोहत्याविरोधात आपली मोहीम चालूच राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी पुढे असेही सांगितले की, येत्या ६ ते १५ आॅक्टोबर या काळात देशभरातील १00 हून अधिक शहरांमध्ये गो सन्मान सोहळे साजरे करणार आहोत. पत्रकार परिषदेस जय श्रीराम केंद्राचे लक्ष्मण जोशी, हिंदू जनजागृती समितीचे सुशांत दळवी, मुंबईचे प्राणीमित्र प्रदीप पांडे, हरे राम हरे कृष्णचे प्रवीण फडते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)