शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

१२५ जणांविरोधात सेसा गोवातर्फे तक्रार

By admin | Updated: December 6, 2015 01:41 IST

डिचोली : शुक्रवारी सुर्ल व बॉम्बे रोड परिसरात झालेल्या ट्रकमालकांच्या आंदोलनप्रकरणी सेसा वेदान्ताचे व्यवस्थापक

डिचोली : शुक्रवारी सुर्ल व बॉम्बे रोड परिसरात झालेल्या ट्रकमालकांच्या आंदोलनप्रकरणी सेसा वेदान्ताचे व्यवस्थापक अब्दुल्ला खान यांनी सुमारे १२५ जणांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. ट्रकमालक संघटनेच्या सुमारे १२५ जणांनी सुमारे १० ट्रकांवर दगडफेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ट्रकचालकांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच एका ट्रकला आग लावल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी सायंकाळी ६.३० वा. सेसा गोवाच्या अधिकाऱ्यांचीही अडवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज काणकोणकर तपास करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर बॉम्बे रोड येथे ट्रकमालक संघटनेने आंदोलन केल्यानंतर शनिवारी सकाळीच पोलिसंनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा व अटक करण्यासाठीची जय्यत तयारी केली. सकाळी लोक जमावाने येऊ लागले. मात्र, त्यानंतर पोलिसांचा पवित्रा बघून या लोकांनी आपला मोर्चा उसगावकडे वळवला. त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेतली व त्यानंतर दुपारी रॅलीने पुन्हा सर्वजण पाळी येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले. शांततेने हे लोक येथे जमले व त्यानंतर उसगाव येथे गेल्याचे सांगितले. पुन्हा सोमवारी आंदोलन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)