पणजी : राज्यातील निवडणुकीच्या अकराही पालिका क्षेत्रांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. अनेक पालिका क्षेत्रांमध्ये विद्यमान नगरसेवकांबाबत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होत आहे. मतदान रविवार, दि. २५ रोजी होणार आहे. ४८ तास अगोदर जाहीर प्रचार थांबविणे गरजेचे असते. त्यानंतर घरोघरी फिरून प्रचार करता येतो. पुढील ४८ तासांत मतदारांना आमिष दाखविण्याच्या गोष्टी घडू नयेत म्हणून राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा डोळ्यांत तेल घालून देखरेख ठेवत आहे. पेडणे, मडगाव, म्हापसा, डिचोली, काणकोण, सांगे अशा काही पालिकांच्या निवडणुका जास्त चुरशीच्या बनल्या आहेत. पेडणेसह काही ठिकाणी भाजपला बंडखोरीस सामोरे जावे लागत आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व सरकारमधील अन्य काही मंत्री तसेच खासदार नरेंद्र सावईकर यांनी प्रचार कामात झोकून दिले आहे. कोणत्याही स्थितीत भाजपच्या ताब्यात अधिकाधिक पालिका आणाव्यात, असा सरकारचा प्रयत्न आहे. (पान २ वर)
पालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढती
By admin | Updated: October 23, 2015 02:01 IST