शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:44 IST

म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: म्हादईच्या प्रश्नावर गोवा व कर्नाटक यांच्यात वाद चालू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे विधान केले आहे. मंगळुरू येथे कॅनरा कल्चरल अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते. आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि केंद्रात व राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे कर्नाटकने कळसा भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्राकडून मंजुरी मिळवताना गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी पळविले असतानाही त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. न्यू कर्नाटकच्या आशा आकांक्षा डबल इंजिन सरकारच पूर्ण करू शकेल, असे ते म्हणाले.

२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवभारत निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'क्लिन इंडिया ते फिट इंडिया' असे अनेक कार्यक्रम राबवले आहेत. कौशल्य विकासासाठी नवे अभ्यासक्रम आणले आहेत. सर्व शैक्षणिक संस्थांनी हे अभ्यासक्रम लागू करावेत, असेही ते म्हणाले.मंगळुरू येथे मुख्यमंत्र्यांनी कोकणी भाषिकांसाठी सेंटर फॉर एक्सलन्सचे उद्घाटन केले. विश्व कोकणी समारोहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोकणीचा आठव्या परिशिष्टात समावेश केल्यानंतर या भाषेची लोकप्रियता वाढली आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

सरदेसाईंकडून टीका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंगळुरु येथे केलेल्या विधानावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली असून, या सरकारला राज्य निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची. तसेच म्हादईपेक्षा सत्ता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.

गोवा ते मंगळुरू 'वंदे भारत' रेल्वे

मंगळुरूहून परतल्यानंतर गोव्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोवा-मंगळुरु 'वंदे भारत' रेल्वे सुरु करण्याची मागणी सरकार करणार आहे. सर्व रेल्वे कोचमध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी असावी, अशीही मागणी केली जाईल. मोपाहून मंगळुरु विमानसेवा सुरु करण्यासाठीही प्रयत्न करू, मुख्यमंत्र्यांनी मंगळुरूहून गोवा प्रवास नेत्रावती एक्स्प्रेसने केला. त्यावेळी वायफाय कनेक्टिव्हिटी नसल्याने त्यांना अडचणी आल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा