लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल नागपूर येथे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सद्वारा आयोजित 'रिपब्लिक इंडिया @७५ आणि त्याही पलीकडे' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे अध्यक्ष अंबादास मोहिते, सरचिटणीस डॉ. संजय फुलकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र यांच्या उपस्थितीत अरुण या संशोधन पत्रिकेचे तसेच शिव्य मुक्त अभियानाचे पोस्टर आणि संघटनेच्या ३० वर्षांच्या वाटचालीच्या स्मरणिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेच्या प्रयत्नांमुळे ज्यांना निवृत्तीवेतन आणि प्रशासकीय कामात मदत झाली, अशा व्यक्तींचा गौरव केला.