शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार बार आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 02:13 IST

पणजी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूच्या दुकानांवरील बंदीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुरुस्ती करून

पणजी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूच्या दुकानांवरील बंदीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुरुस्ती करून त्यात या दुकानांबरोबरच बार, दारुविक्री करणारी रेस्टॉरंट्स आणि पब यांचाही समावेश केला. म्हणजे अशा सर्व आस्थापनांमध्ये आता दारुबंदी असेल आणि त्याची अंमलबजावणी आज, एक एप्रिलपासून होईल. या आदेशामुळे राज्यातील सुमारे ३ हजार २१० बार व दारू दुकानांपैकी किमान पन्नास टक्के म्हणजे सुमारे दीड हजारांवर बार व दारू दुकाने तरी आज, शनिवारपासून बंद होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अन्य राज्यांच्या फेरविचार याचिकांवर शुक्रवारी जो निवाडा दिला, त्याद्वारे राज्याला फार मोठा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील हा व्यवसाय कोसळल्याची व्यावसायिकांची भावना झालेली आहे.न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी आदेश देण्यापूर्वी ज्या दुकानांना दारूचे परवाने दिले होते, ते ३0 सप्टेंबरपर्यंत वैध असतील. त्यानंतर त्या परवान्यांचेही नूतनीकरण केले जाणार नाही. तथापि, १५ डिसेंबरच्या आदेशानुसार इतर दारूची दुकाने १ एप्रिलपासून बंद करावी लागतील, असे न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि एल. एन. राव यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.न्यायालयाच्या शुक्रवारच्या सुधारित आदेशानुसार २० हजार लोकसंख्या असलेल्या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून २२० मीटरवर दारूची दुकाने सुरू ठेवता येतील. त्यांना पाचशे मीटरची अट असणार नाही, एवढाच दिलासा राज्यातील काही व्यावसायिकांना मिळाला.सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्या नेतृत्वाखाली न्यायपीठाने १५ डिसेंबर २०१६ रोजी असा आदेश दिला होता की, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगतच्या ५०० मीटर परिसरात बार व दारू दुकानांवर बंदी असेल. तथापि, हा आदेश शुक्रवारच्या आदेशात स्पष्ट केलेल्या भागांव्यतिरिक्त अन्यत्र लागू असेल, असेही न्यायपीठाने स्पष्ट केले.दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे होणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय दिला आहे. १५ डिसेंबर रोजीच्या आदेशाआधी ज्या दारू विक्रेत्यांना परवाने दिले आहेत, ते परवाने ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत वैध असतील. महामार्गालगत दारूच्या दुकानांसाठी २२० मीटर अंतराचा निकष सिक्कीम, मेघालय आणि हिमाचल प्रदेश यासारख्या डोंगरी राज्यांसाठी तसेच २0 हजार लोकवस्ती असलेल्या भागासाठी लागू असेल.१५ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकांवर विचार करूनच सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा सुधारित आदेश दिला. आधीच्या आदेशामुळे राज्यांचे बजेटच कोलमडेल, अशी साधार भीती व्यक्त करत अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी या आदेशात दुरुस्ती करणे जरुरी असल्याचे म्हटले होते.(खास प्रतिनिधी)