शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीचे अनुदान बंद करा!

By admin | Updated: December 4, 2015 01:28 IST

मांद्रे : इंग्रजी प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या मांद्रे प्रभागाच्या

मांद्रे : इंग्रजी प्राथमिक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या मांद्रे प्रभागाच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आली. मंचच्या मांद्रे प्रभागाची बैठक नुकतीच देऊळवाडा, मांद्रे येथे श्री हनुमान मंदिरात झाली. या वेळी प्रादेशिक भाषांमधील प्राथमिक शाळांच्या सशक्तीकरणासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मांद्रेचे माजी सरपंच अशोक मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत प्रभाग कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आनंद शिरगावकर, राघोबा गावडे, कृष्णा गावडे, मिलिंद केरकर, प्रभाग सचिव तथा केंद्रीय समितीचे सदस्य गजानन मांद्रेकर, केरीचे पंच यशवंत केरकर, प्रचारप्रमुख लक्ष्मण ओटवणेकर, विष्णूबुवा शेटगावकर, दिलीप मेथर, रसिक म्हामल, आत्माजी नाईक, केंद्रीय समितीचे सदस्य वल्लभ केळकर व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत मांद्रे प्रभाग कार्यकारिणी अधिक व्यापक बनवण्याच्या दृष्टीने महिला, विद्यार्थी, सामाजिक तथा सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच कलाकार यांची कार्यकारिणीवर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ डिसेंबरपर्यंत मांद्रे प्रभागातील केरी, पालये, हरमल, कोरगाव, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, चोपडे, पार्से, तुये या गावांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. येत्या गोवा मुक्तिदिनी संपूर्ण गोव्यात एकोणीसही प्रभागांत भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे धरणे आयोजिले आहे. मांद्रे प्रभागाचे धरणे मधलामाज, मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ््यासमोर सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्याचे या बैठक निश्चित करण्यात आले. येत्या २५ डिसेंबर रोजी प्रभागाचा व्यापक मेळावा आयोजित करण्याचे व जानेवारीत माध्यम प्रश्नावर स्थानिक आमदारांची भेट घेण्याचे बैठकीत ठरले. गजानन मांद्रेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. बैठकीचा समारोप करताना अध्यक्ष अशोक मांद्रेकर यांनी हा लढा निर्णायक असल्याने सर्वांनी सर्वशक्तिनिशी या लढ्यात उतरण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)