पणजी : बहुचर्चित लुईस बर्जर-जैका लाचप्रकरणी भक्कम पुरावे आढळल्याने माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सीआयडीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात चर्चिल यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर आरोप आहेत. या दोघांना अटक होईल, अशी अटकळ व्यक्त केली जात होती, ती चर्चिल यांच्या बाबतीत खरी ठरली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) चर्चिल यांना रायबंदर येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. सीआयडीच्या या कार्यालयात कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास चर्चिल यांना अटक करण्यात आली. या वेळी सीआयडी कार्यालयात अधीक्षक कार्तिक कश्यप, निरीक्षक दत्तगुरू सावंत आदी अधिकारी उपस्थित होते. (पान २ वर)
जैका-लुईस बर्जर लाचप्रकरणी सीआयडीची कारवाई
By admin | Updated: August 6, 2015 02:27 IST