पणजी : जैका-लुईस बर्जर लाचप्रकरणी बुधवारी मध्यरात्री नाट्यमयरित्या अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आालेमाव यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात अडकलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटक होणार की नाही, याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. कामत यांनी पणजी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. बुधवारी रात्री उशिरा एखाद्या लहान मुलाला फसवून आणावे, तसे नाट्यमयरीत्या चर्चिल यांना बोलावून घेऊन क्राईम ब्रँचमध्ये आणण्यात आले आणि रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक केली होती. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता (पान २ वर)
चर्चिलला ४ दिवसांची कोठडी
By admin | Updated: August 7, 2015 02:06 IST