शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी साधला आमदारांशी संवाद

By admin | Updated: July 15, 2017 02:07 IST

सर्व आमदारांची

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आठ दिवसांच्या अमेरिका भेटीनंतर शुक्रवारी सकाळी गोव्यात दाखल झाले. दुपारी त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक घेतली व विविध विषयांबाबत तपशीलवार चर्चा केली.दि. १७ रोजी राष्ट्रपती पदासाठी तर २१ रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. पर्रीकर यांनी त्याबाबत भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांनी दुपारी एकच्या सुमारास भाजपच्या आमदारांची बैठक घेतली व मतदानाच्या दिवशी वेळेत या, असा सल्ला त्यांना दिला. राष्ट्रपती पदाच्या तसेच राज्यसभा निवडणुकीवेळी मतदान प्रक्रिया नेमकी कशी असेल ते तुम्हाला त्याच दिवशी सांगेन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आज शनिवारी गोवा भेटीवर येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिली.दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. राज्यात मोठ्या प्रमाणात क्रॉसची मोडतोड सुरू आहे. या प्रकरणी चौकशी कामासाठी पोलिसांना सक्रिय करा, अशी मागणी लोबो यांनी केली. पोलिसांना जमत नसल्यास प्रकरण सीबीआयकडे द्या, असेही लोबो म्हणाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे प्रकरण द्यायला नको, गोवा पोलीसच हा विषय व्यवस्थित हाताळतील, थोडा धीर धरा, असा सल्ला लोबो यांना दिला. लोबो यांनीच ही माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.