शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

नाफ्था प्रकरणी शिपिंग सचिवांमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:20 IST

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विरोधी नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पणजी : वास्कोतील नाफ्थाच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. नाफ्था वाहतूक रस्तामार्गे केली जाणार नाही. तसेच या एकूण प्रकरणात शिपिंग सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आणि एमपीटी चेअरमनविरुद्ध १५ दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विरोधी नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, नाफ्था सडा येथील गणेश बेंझोप्लास्टमध्ये साठविण्यात आल्याने तेथील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वास्कोतील काँग्रेस कार्यकर्ते या प्रश्नावर गेले काही दिवस जोरदार निदर्शने करत आहेत. लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी नाफ्था साठवणे धोकादायक असून जीवितहानी होऊ शकते तसेच रस्तामार्गेनाफ्थाची वाहतूक केल्यास कोणतीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नाफ्था जहाजातून समुद्रमार्गेच अन्यत्र हलवावा.

दुसरी मागणी अशी आहे की, सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी डीजी, शिपिंगकडे देऊ केले आहे, ते अयोग्य आहे. कारण हे जहाज मुरगाव बंदरात आणण्यास डीजी, शिपिंग कारणीभूत आहे, त्यामुळे चौकशीला न्याय मिळणार नाही. हे जहाज कोचीहून गोव्यात कोणी आणले? वाटेत अनेक बंदरे असतांना तेथे का गेले नाही? मुरगाव बंदरात जहाज दुरुस्तीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी ते आणले ही सबब पटण्यासारखी नाही. या एकूण प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे.'

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले की, आम्ही सहा कलमी मागण्या निवेदनाद्वारे सरकारकडे मांडलेल्या आहेत. एमपीटी चेअरमन ई. रमेश कुमार यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात यावा अशी आमची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी यावर पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

या जहाजाचा गोव्याच्या समुद्र हद्दीतील प्रवेश संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. संरक्षण गुप्तचर यंत्रणा किंवा राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा यांच्यामार्फत ही चौकशी होणे आवश्यक आहे. वास्कोत दाट लोकसंख्या असल्याने गणेश बॅन्जोप्लास्टमध्ये साठवलेला हा धोकादायक ठरणार आहे. अ श्रेणीच्या जहाजातूनच तो सुरक्षितरित्या अन्यत्र हलवावा, रस्ता मार्गाचा वापर करू नये. मंत्री मिलिंद नाईक यांनी मुख्य सचिव परिमल राय यांचे त्या जहाजाशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमोणकर म्हणाले.

शिष्टमंडळात महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, एनएसयूआयचे प्रमुख जनार्दन भांडारी,  प्रदेश सचिव नारायण रेडकर, सुदीन नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा