शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बाबूश मोन्सेरात यांच्यावरील आरोप कायम

By admin | Updated: September 13, 2014 01:33 IST

बार्देस : पणजी पोलीस स्थानकावर १९ फेब्रुवारी २००८ रोजी झालेल्या हल्लाप्रकरणी सांताक्रुझ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात

राज चिंचणकर, मुंबईबाबा आमटे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांना त्यांचा मानसपुत्र मानले होते. नानानेही हे नाते नेहमी जपले. बाबांच्या हयातीत आणि त्यानंतरही नानाची आमटे परिवारातील सदस्य ही ओळख कायम आहे. बाबांच्या सान्निध्यात राहून नानाने त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे. नानातला कलावंतही हा अनुभव घेत राहिला. एका सच्च्या कलावंताला आव्हान वाटावे असे व्यक्तिमत्त्व बाबा आमटे यांचे होते मला बाबा आमटेंची भूमिका साकार करायचीय, अशी इच्छाच नानाने आता स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या मराठी चित्रपटात नानाने प्रकाश आमटे यांची भूमिका रंगवली आहे. त्यानिमित्ताने बोलताना नानाने मनातले गुज अलगद उलगडले. मी आनंदवनातच राहणार असे बाबांना म्हणालो होतो; परंतु हे सगळे तुझेच असले तरी तुझा पिंड कलावंताचा आहे, तू इथे रुजणार नाहीस, असे बाबा म्हणायचे. माझ्यावरचा त्यांचा असलेला विश्वास पाहता आज मला वाटते की मला बाबांची भूमिका करायलाच हवी. म्हणजे बाबांचा आणि त्यांच्या मुलाचा असे माझे दोन्ही रोल होतील. फक्त प्रकाशची भूमिका करणे सोपे होते; परंतु बाबांचे विचार, त्यांचे अस्खलित इंग्रजी हे सगळे अंगावर येते. प्रकाश ही एक झुळूक आहे; तर बाबा आमटे हे एक झंझावात होते, त्यामुळेबाबांची भूमिका करायची इच्छा आहे, असे नानाने स्पष्ट केले. नानाने प्रकाश आमटे यांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना समस्त आमटे कुटुंबीयांच्या कार्याला सलाम केला. माझी जी ओळख आहे, त्याला विरोधाभास ठरावी अशी ही भूमिका आहे. यात कुठेही आक्रस्ताळेपणा किंवा आग्रहीपणा नाही. कामात आनंद शोधणारी आमटे परिवारासारखी माणसे मोठीच असतात. माझ्यात ही माणसे झिरपत गेली, अशा शब्दांत नानाने आमटे परिवाराचे जीवनातील महत्त्व विशद केले. मराठीत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीत ‘हेमलकसा’ नावाने निर्माण करण्यात आला आहे. नानासोबत सोनाली कुलकर्णीने यात मंदा आमटे यांची भूमिका केलीआहे. समृद्धी पोरे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळली आहे. आमटेंचे कार्य जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे, अशा भावना समृद्धी पोरे यांनी व्यक्त केल्या.