शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2024 07:53 IST

दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अयोध्येतील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक विधी झाले. रामनामाच्या जयघोषाने गोमंतनगरी दुमदुमून गेली. काल दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळीच त्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात सपत्निक विविध मंदिरांना भेट देऊन देवदर्शन घेतले व पूजा, प्रार्थना व इतर धार्मिक विधी केले. दुपारी अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा गोव्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला.राम नामाचा जप अखंड चालू होता तसेच महाआरती, भजने, कीर्तनेही झाली. सायंकाळी दिंड्या, शोभायात्राही झाल्या. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या.

राजधानी शहरात भाटलेतील तसेच कोलवाळ, पर्वरी वडेश्वर, गिमोणे काणकोण तसेच इतर ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

५५ हजार पणत्या...

वाळपई येथे काल विक्रमी ५५ हजार पणत्या लावून प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारण्यात आली. श्री रामज्योती प्रज्वलित करण्याचा शासकीय पातळीवरील प्रमुख कार्यक्रम काल सायंकाळी पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीजवळ झाला. 

सत्तरीतून तीन वर्षात १५ हजार भाविकांना अयोध्येला पाठवणार

सत्तरी, उसगावमधून पुढील तीन वर्षात १५ हजार भाविकांना अयोध्येला प्रभू श्रीराम दर्शनासाठी पाठवले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. येत्या महिन्यापासून प्रत्येक आठवड्याला एक भाविकांची एक तुकडी अयोध्येला जाईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत