शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात खाणी लवकर सुरू होण्याच्या शक्यता मावळल्या

By वासुदेव.पागी | Updated: April 26, 2023 21:31 IST

-नव्याने पर्यावरण दाखल्यां शिवाय खाणी नाहीच: उच्च न्यायालय

पणजी: गोव्यात खाणी लवकर सुरू करण्यासाठी शॉर्टकट घेण्यासाठी शॉर्टकट मार्ग स्वीकारण्याचे सरकारचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावले आहेत. लिलावात काढण्यात आलेल्या खाण ब्लॉक्समध्ये खनिज उत्खनन सुरू करण्यासाठी नव्याने पर्यावरण दाखले घ्यावेच लागतील असे न्यायालयाने म्हटले आहे.

गोव्यात खाणकाम तातडीने सुरू करण्याच्या गोवा सरकारच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच लिलाव झालेल्या खाण ब्लॉक्सना नव्याने पर्यावरण मंजुरी मिळवावी लागतील, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की ई-लिलाव केलेल्या खाण ब्लॉक्सच्या यशस्वी बोलीदारांनाही खाणीं सुरू करण्यासाठी नवीन मिळवावेच लागतील. खाण लीज धारकांना देण्यात आलेले पर्यावरण दाखल्यांची मूदत व कार्यक्षत्र वाढविण्यात येईल असे जे सरकारने म्हटले होते तसे करणे आता खंडपीठाच्या आदेशामुळे बेकायदेशीर ठरणार आहे.

त्यामुळे नवीन पर्यावरण दाखले लीजधारकांना मिळवावेच लागणार असल्याचा आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि वाल्मिकी मिनेझीस यांच्या खंडपीठाने दिला. खाण लीज दारकांना देण्यात आलेल्या पर्यावरण दाखल्यांची मूदत आणि कार्यकक्षा वाढविली तर लिलाव आटोपल्यावर लवकरच खाणी सुरू केल्या जाऊ शकतील असे आश्वासन सरकारने लिजधारकांना दिले होते . त्यासाठी पूरक कृती करताना सोसियादाद द फॉमेन्तो उद्योग कंपनीने खंडपीठात याचिका सादर केली होती. त्यात खाण खात्याने २५ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेल्या निविदा निमत्रण पत्रात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.

या निविदा निमंत्रण पत्रातील खाण व खनिज कायदा १९५७ कलम ८ बी अंतर्गत ही लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे म्हटले होते. म्हणजेच लिलाव करण्यात आलेल्या खाणीं यशस्वी बोली लगावणाऱ्यालाही (लीजधारकाला) सुरू करण्यासाठी नव्याने पर्यावरण दाखला घ्यावा लागणार आहे. हे कलम रद्द करण्याची मागणी कंपनीने याचिकेत केली होती. २००६ च्या अधिसूचनेनुसार खाण लीजधारकांना देण्यात आलेलेल्या पर्यावरण दाखल्यांची वैधता ३० वर्षे असल्यामुळे याच दाखल्यांच्या आधारावर लीजधारक खाणी सुरू करू शकतील असा याचिकादारकांचा दावा होता.

सरकारचा दावाया खटल्यात सरकारने घेतलेली भुमिका ही याचिकादाराच्या, म्हणजेच खाण कंपनीच्या सुरात सूर मिळविणारीच होती. विद्यमान पर्यावरण दाखले हे ३० वर्षांसाठी चालू शकतात. लिजांचे हस्तांतरण केले म्हणून नव्याने पर्यावरण दाखले घेण्याची गरज न सल्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी युक्तीवादा दरम्यान म्हटले होते.

गोवा फाउंडेशनचा आक्षेपएमएमडीआर कायदा कलम ८ बीत दुरुस्ती करण्यास गोवा फाउंडेशनने तीव्र हरकत घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिलावात काढल्या गेलेल्या खाण लिजांनाही खनिज उत्खनन सुरू करण्यासाठी नव्याने पर्यावरण दाखला घेणे सक्तीचे असल्याचा दावा फाउंडेशनतर्फे करण्यात आला.

टॅग्स :goaगोवा