शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

गोव्यातील बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावणार

By admin | Updated: October 11, 2016 21:18 IST

कदंब वाहतूक महामंडळाच्या सर्व बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावल्या जातील. त्यामुळे महसुल चोरी रोखता येईल. तसेच कदंबच्या बसगाडय़ांना जीपीएस व्यवस्थाही

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 11 -  कदंब वाहतूक महामंडळाच्या सर्व बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावल्या जातील. त्यामुळे महसुल चोरी रोखता येईल. तसेच कदंबच्या बसगाडय़ांना जीपीएस व्यवस्थाही लागू केली जाईल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.कदंब महामंडळाचा 36 वा वर्धापनदिन मंगळवारी साजरा झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कदंबचे चेअरमन कालरुस आल्मेदा आदी यावेळी व्यासपीठावर होते. मंत्री ढवळीकर म्हणाले, की जीपीएस व्यवस्थेचे अनेक फायदे आहेत. रस्त्यावर कुठेही अपघात झाला तर तो पोलिसांबरोबरच कदंब महामंडळालाही कळू शकेल.मंत्री ढवळीकर यांनी आर्थिक सव्रेक्षण अहवालाचाही संदर्भ दिला. कदंब महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर हा अहवाल प्रकाश टाकतो. महामंडळाची स्थिती सुधारण्यासाठी सर्व कर्मचा:यांनी एकजुटीने चांगल्या प्रकारे व प्रामाणिकपणो काम करावे, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.कदंबच्या बहुतेक बसगाडय़ा आमच्याच सरकारच्या कारकिर्दीत आणल्या गेल्या, असे मुख्यमंत्री पार्सेकर आपल्या भाषणात म्हणाले. राज्यातील सगळीच महामंडळे आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनविण्याचा व ही महामंडळे नफ्यात आणण्याचा आमचा उद्देश आहे. कदंब चालक, कंडक्टर्स व मेकनिक्स हे महामंडळाचे महत्त्वाचे घटक असून त्यांचे कल्याण करणो हे आमचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी अनेक कदंब कर्मचारी तसेच शालांत मंडळाच्या परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त केलेल्या कर्मचा:यांच्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कदंबचया मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.2018 सालार्पयत कदंब महामंडळ स्वत:च्या पायावर उभे राहील. आम्ही प्रवासी वाहतुकीचे अनेक नवे मार्ग सुरू केले आहेत, असे चेअरमन आल्मेदा म्हणाले. वाहतूक संचालक सुनील मसुरकर तसेच कदंबचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परैरा नेटो हेही यावेळी उपस्थित होते.