शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापसामध्ये उपजिल्हाधिकाकडून तारक आरोलकरांचा जातीय दाखला मागे

By काशिराम म्हांबरे | Updated: May 23, 2023 10:00 IST

म्हापशाचे माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो यांनी या संबंधी तक्रार दाखल करत त्यांना देण्यात आलेल्या दाखल्याला आवाहन दिले होते.

म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड तारक आरोलकर यांना पालिकेच्या निवडणुकी दरम्यान दिलेला ओबीसीचा दाखला समाज कल्याण खात्याने अवैध ठरवल्यानंतर बार्देशाच्या उपजिल्हाधिकाºयाने दाखला मागे घेतला आहे. दाखल्याची प्रत राज्य निवडणुक आयोगाकडे पुढील निर्णयसाठी पाठवली जाणार आहे. दिलेला दाखला मागे घेण्यात आल्याने नगरसेवकाच्या भवितव्यावर पुढील निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.  

दरम्यान देण्यात आलेला दाखला मागे घेण्यात आला असल्याने आरोलकरांवरील अपात्रतेची टांगती तलवार कायम राहिली असून त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवले जाणार किंवा नाही याकडे म्हापसावासियांचे लक्ष लागून राहिली आहे. म्हापशाचे माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो यांनी या संबंधी तक्रार दाखल करत त्यांना देण्यात आलेल्या दाखल्याला आवाहन दिले होते.  दिलेल्या आवाहनावर सुनावणी घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात  समाज कल्याण खात्याच्या त्रिसदस्यीय छाननी समितीने तो अवैध ठरविला होता. आरोलकर यांना हा दाखला एप्रिल २०२१ साली पालिकेच्या निवडणुक पूर्व देण्यात आला होता. सदर दाखल्याची योग्य तपासणी न करता उपजिल्हाधिकाºयाकडून देण्यात आला असल्याने तो रद्द करण्यात यावा असेही दाखला अवैध ठरवताना छाननी समितीने म्हटले आहे.  आरोलकर म्हापशातील प्रभाग ७ यातून पालिकेवर निवडून आले होते.

उपजिल्हाधिकाºयाने घेतलेल्या निर्णयाची प्रत संबंधीत प्राधिकारणीला पाठवण्यात आली आहे. यात पालिका प्रशासनाचे संचालनालय, म्हापसा पालिका, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच निवडणुक आयोगाचा त्यात समावेश होतो. उपजिल्हाधिकाºयाने दिलेला दाखला मागे घेतल्याने त्याची दखल घेऊन उच्च प्राधिकारणीने त्यांना तातडीने अपात्र घोषित करावे अशीही विनंती तक्रारदार फ्रॅन्की कार्व्हालो यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवा