शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनोंचा ओला कचरा ताळगावला

By admin | Updated: August 26, 2016 02:10 IST

पणजी : कॅसिनोंचा ओला कचरा विल्हेवाटीसाठी ताळगावला नेणे, रिलायन्स केबल खोदकाम प्रकरणात कंपनीकडून येणे असलेले १ कोटी २0 लाख रुपये वसूल

पणजी : कॅसिनोंचा ओला कचरा विल्हेवाटीसाठी ताळगावला नेणे, रिलायन्स केबल खोदकाम प्रकरणात कंपनीकडून येणे असलेले १ कोटी २0 लाख रुपये वसूल करण्यासाठी कायदेविषयक सल्ला घेणे, परवानगीशिवाय टॉवर उभारल्यास जमीनमालकाला २ लाख रुपये आणि कंपनीला ५ लाख रुपये दंड ठोठावणे आदी महत्त्वाचे ठराव गुरुवारी महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आले. रिलायन्स प्रकरणावरून वातावरण तापले. कंपनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांत गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी करण्यात आली. १५ दिवसांत पैसे न भरल्यास केबल काढून टाकू, असा इशारा महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला. रिलायन्स प्रकरणात चौकशी अहवाल पालिका प्रशासनाला पाठवला असल्याचे आयुक्त दीपक देसाई यांनी सांगितले. खोदकाम भरपाईसाठी ६00 रुपये प्रति मीटर दर असताना केवळ ५0 रुपये प्रति मीटर आकारण्यात आले. कमी दर आकारण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल नगरसेवक उदय मडकईकर व दिनेश साळगावकर यांनी केला. या प्रकरणी उपायुक्तांचे अधिकार काढून घेतले; तसेच सर्व फाईल्सही त्यांच्याकडून काढून घ्याव्यात व मोटार आणि चालकही काढून घ्यावा, अशी मागणी साळगावकर यांनी केली. यापुढे कोणत्याही मोबाईल कंपनीला खोदकाम करू देणार नाही, असे फुर्तादो यांनी स्पष्ट केले. सोपो घोटाळ्यातील वसुली कधी करणार, असा सवाल मडकईकर यांनी केला. मार्केटमध्ये अजूनही सोपो गोळा केला जात आहे कोणाचेही नियंत्रण नाही, असा आरोप त्यांनी केला. ओला कचरा पाटो येथे टाकण्यास मनाई असताना मनपाचाच एक चालक खाजगीत हे काम करुन पैसे उकळत आहे हा आणखी एक मोठा घोटाळा आहे आणि संगनमताने हे चालू असल्याचा गौप्यस्फोट महापौरांनी केला. या प्रकरणाच्याही मुळाशी जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. कॅसिनोंचा ओला कचरा हाताळण्याची मनपाची क्षमता नाही. त्यासाठी हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस असलेला प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे, असे आयुक्त म्हणाले. त्यावर या प्रकल्पाचे काम जीएसआयडीसीकडे असताना आणि केवळ शेडवर पत्रा टाकण्याचे क्षुल्लक काम बाकी असताना विलंब का, असा प्रश्न करण्यात आला. (प्रतिनिधी)