शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केसिनो मांडवीतच राहणार, पर्यायी जागेविषयी अजून निर्णय नाही: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:09 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दर सहा महिन्यांनी मांडवी नदीतील कसिनो जहाजांना मुदतवाढ देण्याचा निर्णय गेली काही वर्षे होत आहे.

पणजी : मांडवी नदीत सध्या जे केसिनो आहेत, ते मांडवीतच राहतील हे बुधवारी स्पष्ट झाले. मंत्रिमंडळाने या कसिनो जहाजांना मांडवीत आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. केसिनो अन्यत्र कुठे हलविण्याचा निर्णय अजून झालेला नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.  यावरून कसिनो मांडवीतच राहतील हे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दर सहा महिन्यांनी मांडवी नदीतील कसिनो जहाजांना मुदतवाढ देण्याचा निर्णय गेली काही वर्षे होत आहे. पर्रीकर सरकार अधिकारावर असल्यापासून हा निर्णय होतो. बुधवारीही आणखी सहा महिने मुदतवाढ दिली गेली.

मांडवीतून अन्यत्र कुठे कसिनो नेण्याचा प्रस्ताव आहे असे पत्रकारांनी विचारले असता, अन्य कुठे कसिनो न्यावेत असा निर्णय सरकारने घेतलेला नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मांडवीत आता जिथे कसिनो आहेत, तिथे ते राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. बेतीच्याबाजूने कसिनो नेले जातील असे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी यापूर्वी म्हटले होते, याकडे लक्ष वेधले असता, तसा निर्णय सरकारने घेतलेला नाही एवढेच मुख्यमंत्री म्हणाले.

पाणी बिल योजना फेब्रुवारीपर्यंतदरम्यान, वीज खात्याप्रमाणेच बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने जी थकीत पाणीपट्टी भरून घेण्यासाठी योजना आणली आहे, त्या योजनेची मुदत फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने तसा प्रस्ताव मंजुर केला. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्यास्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण देणारी योजना आहे. या योजनेची मुदत येत्या १ मार्च  रोजी संपुष्टात येत होती. ही मुदत आता आणखी दोन वर्षांनी म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मंंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आणखी दोन वर्षे स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकरीसाठी आरक्षण मिळेल. लवकरच सरकार चोवीस मुलांना नियुक्ती पत्र देणार आहे. त्या शिवाय जी सुमारे दोनशे मुले नोकरीवीना आहेत, त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तूर्त मानव संसाधन विकास महामंडळात सामावून घेतले  जाईल व कायमस्वरुपी नोकऱ्या उपलब्ध झाल्यानंतर त्यात या मुलांचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत