शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्या जमीन प्रकरणात लोकायुक्तांसमोर सुनावणी ८ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:51 IST

माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्या विरोधात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर असलेल्या ७0 कोटींच्या जमीन प्रकरणात सुनावणी ८ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पणजी : माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्या विरोधात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर असलेल्या ७0 कोटींच्या जमीन प्रकरणात सुनावणी ८ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.लोकायुक्तांच्या निर्देशानुसार मुख्य सचिवांनी सर्व संबंधित दस्तऐवज सादर केलेले असून त्याची छाननी सध्या सुरु आहे. शिरोडकर व त्यांच्या नऊ कर्मचाऱ्यांनी या जमिनीवर शिरोडा अर्बन को आॅपरेटिव्ह बँकेकडून प्रत्येकी १0 लाख रुपये कर्ज घेऊन ही जमीन गहाण ठेवलेली असतानाही उद्योग खात्याने ती घेतलेली आहे, असा दावा याचिकादार आयरिश रॉड्रिग्स यांनी केला असून या प्रकरणात दस्तऐवज सादर करण्यास परवानगी मागितली.अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपप्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची ७0 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केलेली आहे, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनाही या तक्रारीत प्रतिवादी करण्यात आले आहे. हा मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमदारकी तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपप्रवेश केलेले शिरोडकर यांना या व्यवहारातून सरकारने कसा फायदा करुन दिला याची माहिती लोकायुक्तांसमोर त्यानी ठेवली आहे. शिरोडा येथील लागवडीखालील तब्बल १ लाख ८३ हजार ५२४ चौरस मिटर जमीन सरकारने ७0 कोटी रुपयांना विकत घेतली. शिरोडकर व त्यांचे तीन बंधू अमित, उमेश आणि सत्तेश यांच्या वेदांता रीयल इस्टेट डेव्हलॉपर्सने ही जमीन १९ आॅक्टोबर २00६ रोची केवळ ४५ रुपये प्रती चौरस मिटर दराने विकात घेतली होती. सरकारने हीच जमीन शिरोडकर यांच्याकडून आता ३,५00 रुपये प्रती चौरस मिटर दराने घेतली. बाजारदरापेक्षाही जास्त किंमत शिरोडकर यांना या जमिनीसाठी सरकारने दिली. शिरोडा येथे अन्य एका जमीनमालकाने ५ एप्रिल २0१८ रोजी सरकारला प्रस्ताव पाठवून आपली १ लाख ४0 हजार ६५0 चौरस मिटर जमीन केवळ ३५0 रुपये प्रती चौरस मिटर या दराने देऊ केली होती परंतु सरकारने कमी रकमेची ही जमीन नाकारुन शिरोडकर यांची महागडी जमीन विकत घेतली. महागडी जमीन खरेदी करुन एकाअर्थी शिरोडकर यांना भाजपप्रवेशासाठी लांच देण्यात आल्याचा आरोप आयरिश यांनी केला आहे.