शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कर्नाटकी डाव उधळला

By admin | Updated: September 13, 2015 03:01 IST

म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकाने शनिवारी पुन्हा अरेरावी केली. कणकुंबी येथे आंदोलकांनी म्हादईचा बांध फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गोव्याने

म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकाने शनिवारी पुन्हा अरेरावी केली. कणकुंबी येथे आंदोलकांनी म्हादईचा बांध फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गोव्याने सतर्कतेने वेळीच हस्तक्षेप केला. परिणामी ही अरेरावी कर्नाटकाच्या पोलिसांनी हाणून पाडली. या घटनेनंतर कणकुंबीत असलेले कुडगोळचे आमदार सी. एस. शिवल्ली यांनी कर्नाटकाची मागणी मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात ‘चलो दिल्ली’ आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. कर्नाटकाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची डरकाळी त्यांनी फोडली. दरम्यान, आंदोलकांच्या गटातील दोघे दुचाकीने जाताना जावेरी येथे अपघातात सिद्धांता तलवार हा कार्यकर्ता मरण पावला, तर एका जखमीवर केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत. कर्नाटकातील काँग्रेसचे विविध नेते व शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून गोव्याच्या सीमेवर कणकुंबी येथे धरणे धरले आहे. या आंदोलकांनी शनिवारी पदयात्रा काढली. म्हादईचे पाणी वळवण्याबाबत केंद्र व राज्य सरकार तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी तर चक्क बांधाची बंद केलेली दारे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोव्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क केल्याने वेळीच पोलीस बंदोबस्त वाढवल्याने आंदोलकांचा हा डाव फसला. गोव्याने म्हादईचा विषय लवादासमोर प्रभावीपणे मांडल्यानंतर लवादाने कर्नाटकाला ३१ मे २०१४ रोजी कालव्याची दोन्ही दारे (तोंडे) बांध घालून बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे कर्नाटकाने कार्यवाही केली. (पान २ वर)