शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Goa: चुका दाखवून देता ना? मग चांगले काम झाल्यावर शाबासकी पण द्या :वीजमंत्री सुदिन ढवळीकर

By आप्पा बुवा | Updated: June 12, 2023 19:24 IST

Goa: वीज खात्यात काम करत असताना अभियंताकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून चुका होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहोत.

- अप्पा बुवाफोंडा - खांडेपार पंचायत क्षेत्रातील लोकांना वीज खात्यासंबंधीत कामे घेऊन उसगावला जावे लागायचे. ती समस्या लक्षात घेऊन कृषी मंत्री रवी नाईक व पंचायतीने खांडेपार पंचायत क्षेत्रातच सेक्शन ऑफिस असावे अशी मागणी करून पाठपुरावा केला होता . सदर कार्यालयासाठी जागा मिळवून देण्यासाठी सुद्धा रवी नाईक यांनीच प्रयत्न केले.आज त्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. असे उद्गार वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले. खांडेपार पंचायत इमारतीच्या तळमजल्यावरील वीज खात्याचे सेक्शन ऑफिस सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी, पंच सदस्य बाबू चारी, निळकंठ नाईक ,कार्यकारी अभियंता भरतन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मागच्या एक वर्षात वीज खात्याचा संपूर्ण कायापालट करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे. या कामी मुख्यमंत्र्यांनी दिलेले सहकार्य आम्ही विसरणार नाही. वीज खात्यात काम करत असताना अभियंताकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून चुका होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहोत.

राज्य कारभार पुढे नेत असताना टीका ह्या होणारच परंतु टीका करणाऱ्या लोकांनी सकारात्मक टीका करावी. त्याचबरोबर दोष दाखवून द्यावे. जर काही चांगले काम होत असेल तर त्या कामाचा बद्दल समाधान सुद्धा व्यक्त व्हायला हवे.

टॅग्स :goaगोवा