शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्स परिषद जेवण घोटाळा प्रकरणी मानवी हक्क आयोगासमोर फेरसुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 15:15 IST

केटररची बाजू ऐकून घेण्यासाठी फेरसुनावणी घ्यावी तसेच तीन महिन्यात हे प्रकरण निकालात काढावे, असे हायकोर्टाने गेल्या १८ रोजी बजावले होते.

पणजी : २०१६ साली दक्षिण गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेच्यावेळी पोलिसांना पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवण प्रकरणात हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्य मानवी हक्क आयोगाने फेरसुनावणी सुरु केली. निवृत्त न्यायाधीश यु. व्ही. बांक्रे, न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता व प्रमोद कामत यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही फेरसुनावणी सुरु झालेली आहे. पुढील सुनावणी येत्या ६ रोजी ठेवण्यात आली आहे.

डिचोली येथील मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सने हे जेवण पुरविले होते. आयोगाने या केटररची बाजू ऐकून घेण्यासाठी फेरसुनावणी घ्यावी तसेच तीन महिन्यात हे प्रकरण निकालात काढावे, असे हायकोर्टाने गेल्या १८ रोजी बजावले होते. १४ ऑक्टोबर २0१६ रोजी दक्षिण गोव्यात ब्रिक्स परिषद झाली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसांना जेवण पुरविण्यासाठी तब्बल ५१ लाख ६० हजार रुपयांचे कंत्राट मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सला देण्यात आले होते. त्यासाठी योग्य त्या निविदाही काढल्या नाहीत. या केटररने अन्य एकाला उपकंत्राट दिले आणि वेर्णा येथे खुल्या जागेत अन्नपदार्थ शिजविण्यात आले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ पोलिसांना पुरविले गेले, असा आयरिश रॉड्रिग्स यांचा दावा असून या कंपनीला कंत्राटाची रक्कम फेडू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. 

पोलिसही माणूस आहेत आणि त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे आयरिश यांचे म्हणणे असून पोलिसांनाही माणसाप्रमाणे वागणूक द्या, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा द्या, असे राज्य मानवी हक्क आयोगाने वेळोवेळी बजावले असतानाही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही, अशीही आयरिश यांची तक्रार आहे.