शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण

By admin | Updated: October 13, 2016 05:44 IST

भाजपाचे निवडणूक निशाणी असलेले कमळ ब्रिक्स परिषदेसाठी बोधचिन्ह म्हणून वापरल्याबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी हरकत

पणजी : भाजपाचे निवडणूक निशाणी असलेले कमळ ब्रिक्स परिषदेसाठी बोधचिन्ह म्हणून वापरल्याबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी हरकत घेतली असून बुधवारी आल्तिनो निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सरकारने ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण केले आहे, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कमळ हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पक्षाचा असा प्रचार करणे गैर आहे. १९६८ च्या निवडणूक चिन्ह आदेशाचा भंग करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. शांताराम म्हणाले की, केंद्रात भाजपा सरकारने शिक्षणातही कसे भगवेकरण आणले हे आम्ही पाहिले आहे. राजीनामा दिलेल्या एका माजी राज्यमंत्र्यानेही नंतर हे मान्य केलेले आहे. गोव्याबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाबमध्ये आगामी तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने अशा पद्धतीने आपल्या निशाणीचा वापर करणे उचित नव्हे. तीन दिवसांपूर्वी इंटरनेटवर सर्फिंग करताना ही गोष्ट आपल्या लक्षात आली त्यानंतर निवडणूक आयोगाला आपण पत्रही लिहिले. या पत्राची प्रत नावती यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. अ. भा. काँग्रेस समितीच्या निदर्शनास आपण ही बाब आणली असून विरोधासाठी अन्य पक्षांचीही मदत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.११ तिबेटींना अटकब्रिक्स परिषदेला विरोध करण्यास गोव्यात आलेल्या ११ तिबेटींना मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तिबेटीयन नॅशनल काँग्रेसच्या झेड्यांखाली ते बुधवारी कर्नाटकातून रेल्वेमार्गे गोव्यात आले होते. (प्रतिनिधी)