शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून गोव्यातील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:18 IST

गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने गोव्याच्या मुख्यमंत्री निधीत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे.

पणजी :  गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने गोव्याच्या मुख्यमंत्री निधीत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्या पुढाकाराने ही देणगी मुख्यमंत्री निधीला मिळाली  असून त्यासंबंधीचा धनादेश आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रदान करण्यात आला. 

गेल्या पंधरवड्यात गोव्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने डिचोली, पेडणे, बार्देस तालुक्यातील गावामध्ये लोकांच्या घरांची हानी झाली तसेच केळीच्या बागायती शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. पुराची झळ पोचलेल्या लोकांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदतीसाठी सरकार प्रयत्नरत आहे.

पूरग्रस्तांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी महसूल खात्याने सर्वेक्षण केल्यानंतर 553 घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे आढळून आले. या घरांना प्रत्येकी 9169रुपये मंजूर करण्यात आले असून एकूण 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय जीडीआरएफखाली त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार आहेत. या पुरात 12 घरांची पूर्णपणे हानी झाली. या घरांना प्रत्येकी 95,100 रुपये भरपाई महसूल खात्याने मंजूर केली आहे. तसेच पूरात दोघांचे बळी गेले या दोघांच्या जवळच्या नातलगाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याशिवाय शेती, बागायतीची मोठ्या प्रमाणात झाली आहे सुमारे 77 लाखांची हानी ही केवळ केळी बागांची आहे.

टॅग्स :goaगोवाfloodपूरPramod Sawantप्रमोद सावंत