शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस महिला डॉक्टरच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: October 5, 2014 01:22 IST

सावर्डे : ४७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातलेल्या झरीवाडा-दवर्ली, मडगाव येथील पूजा दामोदर शंके (३३) या महिलेला केपे

सावर्डे : ४७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून २५ लाख २१ हजार रुपयांना गंडा घातलेल्या झरीवाडा-दवर्ली, मडगाव येथील पूजा दामोदर शंके (३३) या महिलेला केपे न्यायालयाने आणखी चार दिवसांच्या रिमांडावर कुडचडे पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर माधेगाळ-काकोडा येथील दुसरा एक अल्पवयीन साथीदार अपना घरात आहे. आपण डॉक्टर असल्याचे भासवून या दोघांनी रिवण येथे लोबो निवास या फिलीप लोबो यांच्या घरात पहिल्या मजल्यावर व खाली एक रुम भाड्याने घेऊन तेथे नर्सिंग प्रशिक्षण केंद्र उघडले होते. या केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर बांबोळी येथील गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरी देण्यात येणार, अशी बतावणी करून एकूण ४७ जणांकडून २५ लाख २१ हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी पंचवाडी-शिरोडा येथील सुप्रिया देसाई हिने कुडचडे पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती. शनिवारी पोलिसांनी रिवण येथे जाऊन पंचनामा केला व आॅफिसवजा प्रशिक्षण केंद्रातील सर्व साहित्य जप्त करून ते कुडचडे येथे आणले. या साहित्यात खाटा, कपाटे, काउन्टर, टेबले, खुर्च्या, लस टोचणीच्या सिरिंज, ड्रीप लावण्यासाठी वापरण्यात येणारे स्टॅण्ड, औषधे, विविध प्रकारची रुग्ण तपासणीची यंत्रे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोगस डॉक्टरांनी कुडचडे येथील एका स्टेशनरी दुकानातून स्टेशनरी नेली होती. तसेच त्यांच्याकडून डॉक्टरांचे रबर स्टॅम्पही बनवून घेतल्याचे उघड झाले आहे. आलिशान गाडीतून येऊन अल्पवयीन आरोपी स्टेशनरीची आॅर्डर देत होता. सध्या या स्टेशनरी दुकानदाराचे सुमारे ५१ हजार रुपये देणे असल्याची माहिती मिळाली. ऐटीत शॉपमध्ये येऊन त्याने खरेदी केल्याने दुकानमालकास संशयच आला नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघेही बोगस डॉक्टर निघाल्याने त्याला ५१ हजारांना गंडा पडला असून बोगस रबर स्टॅम्प करून दिल्याप्रकरणी त्याला आता पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. कुडचडे पोलिसांनी ४७ जणांना येत्या ७ आॅक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात बोलावले असून त्या दिवशी आरोपी व त्यांची समोरासमोर जबानी घेतली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कुडचडे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पूजा नावाची एक डॉक्टर असून या बोगस डॉक्टरांनी नोकरीचे आमिष दाखविलेल्या व्यक्तींना तिचा फोन क्रमांक दिला होता. काही जणांकडून त्या खऱ्या डॉक्टरांना फोन येऊ लागल्याने तिने थेट कुडचडे पोलीस स्टेशन गाठले होते. यानंतर हे बिंग फुटले. खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स सुप्रिया देसाई जाळ्यात अडकली. फसलेल्यांची नावे - १) सुप्रिया देसाई, एक लाख, २) सलीम मुल्ला, एक लाख, ३) रफिक पतियाळ, ५0 हजार, ४) शबाना खान, ४ हजार, ५) मंजप्पा पाटील, ३0 हजार, ६)दस्तगीर रहमानभाई, १५ हजार, ७) स्वप्नेश कुट्टीकर, ५0 हजार, ८) सारिका केवणकर, ५0 हजार, ९) लक्ष्मण नाईक, ५0 हजार, १0), खुतिजा पतियाळ, ४ हजार, ११) नाजमुलसेहर मदरकांडी, ३ हजार, १२) मेहबूबी मुल्ला, ५0 हजार, १३) हुसेन सय्यद, ५0 हजार, १४) हलिमा शेख, ५0 हजार, १५) गौस्पक मुल्ला, ५0 हजार, १६) राम नाईक, २0 हजार, १७) नीलेश वेळीप, ६0 हजार, १८) शशी वेळीप, ६0 हजार, १९) प्रेमानंद खांडेपारकर, ६0 हजार, २0) लिया नाईक, ४५ हजार, २१) दिनेश गावकर, ७0 हजार, २२) राजेश बोरकर, ७0 हजार, २३) पुरुषोत्तम वेळीप, ५0 हजार, २४) शीतल वेळीप, ५0 हजार, २५) तनुजा गावकर, ८0 हजार, २६) संतोष वेळीप, ५0 हजार, २७) प्रभाकर गावकर, ७0 हजार, २८) अक्षया वेळीप, ५0 हजार, २९) उमेश गावकर, ७0 हजार, ३0) सुकांत कवळेकर, ५0 हजार, ३१) नम्रता गावकर, ४0 हजार, ३२) सविता कवळेकर, ६५ हजार, ३३) रेश्मा गावकर, ५0 हजार, ३४) संदेश कवळेकर, ५0 हजार, ३५) शशी वेळीप, ५0 हजार, ३६) रोहन गावकर, ५0 हजार, ३७) विशाल पैंगीणकर, ५0 हजार, ३८), राजेंद्र गावकर, ५0 हजार, ३९) स्वप्ना पैंगीणकर, ५0 हजार, ४0) सुभाष गावकर, ६0 हजार, ४१) प्रदीप गावडे, ६0 हजार, ४२) गौसावी मुल्ला, २0 हजार, ४३) हसन सय्यद, एक लाख, ४४) लाला सौदागर, ९५ हजार, ४५) प्रदीप भुसारे, एक लाख, ४६) सफी सय्यद, २0 हजार, ४७) व्यंकटेश्वरलू कोट्टे, एक लाख. (लो.प्र.)