शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉच्या शवागरातून तरुणाचा मृतदेह गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:50 IST

बेवारस समजून लावली विल्हेवाट; कुटुंबियांवर आभाळ, गाव संतप्त

पणजी : ऐन तारुण्यात अवघ्या २४ व्या वर्षी निधन झालेल्या आपल्या कुटुंबाच्या सदस्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जातात तेव्हा त्यांना सांगण्यात येते की ‘हा मृतदेह शवागरात नाही, त्याची विल्हेवाट लावण्यात आले आहे‘. यावेळी काय परिस्थिती होईल त्या कुटुंबाची? ही कहाणी नसून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घडलेली वस्तुस्थिती आहे. बेजबाबदारपणाचा कळस ठरलेल्या घटनेत बेवारसी मृतदेह म्हणून भरत्याच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. २४ वर्षीय जानूझ पावेल गोन्साल्वस या हळदोणे येथील युवकाचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. गोमेकॉत नेऊन त्याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात आले होते. मृतदेह शवागरात ठेवण्यात आला होता. मयताच्या कुटुंबियातील एक सदस्य विदेशातून येईपर्यंत मृतदेह गोमेकॉतच ठेवला जाणार होता. त्याच दरम्यान २४ सप्टेंबर रोजी गोमेकॉतील कुणीही दावा न केलेले व नातेवाईकांच्या ओळखी पाळखी वगैरे न मिळालेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यावेळी जानूजच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. आधीच दु:खात असलेल्या कुटुंबियांवर या घटनेमुळे मोठा आघात झाला असून संपूर्ण गांव संतप्त बनला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीसांनी या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली आहे. अंत्यसंस्कार करायला मृतदेह नाही आणि अखेरचे दर्शन घेण्यासठीही मृतदेह नाही अशी परिस्थिती बनली आहे. असा प्रकार गोव्यात पहिल्यांदाच घडला आहे. 

तिघे निलंबित, फौजदारी गुन्हे नोंदया घटनेमुळे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख असलेले अ‍ॅडमंड रॉड्रिगीश यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या बरोबरच लॅब टेक्नीशन मच्छिंद्र जल्मी आणि अटेंडंट प्रकाश नार्वेकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटल