शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

कब्रस्तानातून मृतदेह गायब

By admin | Updated: March 5, 2017 02:29 IST

डिचोली : कब्रस्तानात दहा दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह गायब होण्याचा प्रकार मुजावरवाडा-साखळी येथे शनिवारी (दि. ४) उघडकीस

डिचोली : कब्रस्तानात दहा दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह गायब होण्याचा प्रकार मुजावरवाडा-साखळी येथे शनिवारी (दि. ४) उघडकीस आला. त्यामुळे साखळी आणि परिसरात खळबळ माजली आहे. समाजमन संतप्त बनले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी मृतदेहाचा कब्रस्तानात शोध घेऊनही तो न मिळाल्याने तणाव कायम आहे. मृत व्यक्तीचे पुत्र ओसीम अत्तार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळवाडी-साखळी येथील अब्दुल करीम अत्तार (५६) यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्यावर मुजावरवाडा येथील कब्रस्तानात दफनविधी केले होते. अत्तार वीस वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. डिचोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास दफनविधी केले होते. त्यानंतर नवव्या दिवशी दफन विधीच्या ठिकाणी कुटुंबीयांनी फुले वाहण्याचा विधीही केला होता. फुले वाहण्याच्या विधीनंतर दहाव्या दिवशी (दि. ४ मार्च) रोजी कब्रस्तानात गेलेल्यांना संबंधित ठिकाणी उकरल्याचे दिसले. संबंधितांनी ही माहिती अत्तार यांच्या कुटुंबीयांना तसेच पोलिसांनाही दिली. पोलीस उपअधीक्षक रमेश गावकर, निरीक्षक नारायण चिमूलकर, डिचोलीचे प्रभारी उपजिल्हाधिकारी श्रीपाद आर्लेकर यांनाही या घटनेची माहिती दिली. साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, नगरसेवक रियाज खान आदींच्या उपस्थितीत दफनविधी केलेल्या जागी खोदले असता मृतदेह मिळाला नाही. दफनविधीवेळच्या केवळ फळ्या तेथे मिळाल्या. अन्य काहीही दिसले नाही. पोलिसांना तेथे हातमोजे मात्र मिळाले असून ते जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)