शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मगोपवजा सरकारसाठी भाजपचे जोरदार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 01:54 IST

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिलेला दगा आणि पुढील सरकारात मगोपचाच मुख्यमंत्री

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दिलेला दगा आणि पुढील सरकारात मगोपचाच मुख्यमंत्री असण्याच्या त्या पक्षाकडून पुढे केलेल्या पूर्वअटीच्या पार्श्वभूमीवर भाजपही आक्रमक झाला आहे. त्यामुळे मगोपशिवाय सरकार स्थापन करण्याचे भाजपमध्ये तत्त्वत: ठरलेले आहे. त्यासाठी आतापासूनच भाजपने रणनीती आखली आहे. जे अपक्ष निवडून येऊ शकतील, अशांंच्या गाठीभेटी घेण्याचे काम भाजपमधील काही मंडळी सध्या करत आहे. येत्या ११ मार्चला, शनिवारी गोवा विधानसभेचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर चित्र नेमके स्पष्ट होईल.मगोपने गोवा सुरक्षा मंच पक्षाची साथ घेऊन आपल्याला दुखवल्याची भाजपच्या कोअर टीमची भावना बनल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांकडून मिळते. मगोपने केवळ प्रियोळ, फोंडा, मडकई व डिचोली, पेडण्यातच नव्हे तर हळदोणा, म्हापसा, सावर्डे, वाळपई, नावेली, दाबोळी अशा अनेक मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांची दमछाक करण्याचा प्रयत्न केला. काही मतदारसंघांमध्ये तर मगोपने मुसंडीही मारल्यासारखी स्थिती आहे. यामुळे आता सत्ता मिळाली तर मगोपला विरोधात बसविणे हे भाजपने प्रथम कर्तव्य मानले आहे. मगोपचे आमदार विरोधात बसले तर पाच वर्षांत या पक्षाचा शक्तिपात होईल, असे भाजपला वाटते. भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत यापूर्वी याविषयी चर्चाही झाली आहे. शक्यतो मगोपशिवायच सरकार स्थापन करावे, त्यासाठी प्रसंगी अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करण्याची संधी मिळाल्यास ती घ्यावी, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या पक्षातील इतरांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. मगोपचे नेते सुदिन आणि दीपक ढवळीकर या बंधूंवर पर्रीकर आणि पार्सेकर खूप नाराज आहेत. निवडणूक प्रचारावेळी पर्रीकर यांनी प्रथमच ढवळीकर बंधूंना टार्गेट केले होते. मगोपचा विस्तार झाला तर, भाजपच्या मतांमध्ये घट होत जाईल व त्यामुळे मगोपला सत्तेपासून दूर ठेवणे हा भाजपचा एक कलमी कार्यक्रम बनला आहे. अर्थातच मगोपला भाजपच्या चालीची कल्पना आलेली आहे. त्यामुळे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी यापुढे प्रादेशिक पक्षांनीच सरकार बनवावे व राष्ट्रीय पक्षांचा त्यासाठी फक्त पाठिंबा घ्यावा, असे विधान केले आहे. (खास प्रतिनिधी)