शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांचा ग्रामीण भागात जल्लोष

By admin | Updated: May 18, 2014 00:17 IST

लातूर : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड विजयी झाल्यामुळे ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला़

 लातूर : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड विजयी झाल्यामुळे ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला़ मतदानानंतर तब्बल तीस दिवसांच्या निकालाची प्रतीक्षा करणार्‍या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या मिरवणुकामध्ये उत्साह द्विगुणित केला़ ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणुका काढल्या़ वलांडी : भारनियमनामुळे सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने अनेजण भ्रमणध्वनीवरून मतमोजणीचा कानोसा घेत होते़ वीज आल्यानंतर टीव्हीवरून मतमोजणीचा अंदाज घेतानाच सकाळी १० वाजेपर्यंत वलांडी चौकात व परिसरात गावागावात फटाक्याची अतिषबाजी सुरु झाली़ देशात भाजपाला स्पष्ट बहुमत व लातूरचा डॉ़ सुनील गायकवाड यांच्या विक्रमी विजयामुळे ठिकठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला़ यावेळी पं़स़ सदस्य तुकाराम पाटील, शिवा जगताप, चैैतन्य मुंजाळ, सुखवंत रंडाळे, प्रशांत पाटील, चंद्रशेखर महाजन, धनराज बिरादार, बालाजी बिरादार, वसंत जगताप, ज्ञानोबा बिरादार, रामलिंग शेरे आदी उपस्थित होते़ किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत लातूरमधून डॉ़ सुनील गायकवाड यांचा विजय झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून स्वागत केले़ यावेळी माजी जि़़प़ सदस्य त्र्यंबक गुट्टे, माजी सरपंच बाळू मुंढे, खलील पठाण अनेक गावातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून व एकमेकांना पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला़ शिरूर ताजबंद : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद व परिसरातील कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच भाजपाला आघाडी मिळत असल्याचे पाहून ठिकठिकाणच्या चौकात व गावागावात जल्लोष साजरा करून नरेंद्र मोदींच्या घोषणा देवून फटाक्यांची आतषबाजी केली़ उमरगा, यल्लादेवी, वायगाव, तेलगाव, आंबेगाव, सय्यदपूर, कुमठा बु़, वळसंगी, चोबळी, माकणी आदी गावात विजयाचा जल्लोष फटाके वाजवून करण्यात आला़ यावेळी दिनेश पाटील, बी़जी़पडोळे, ज्ञानोबा मंतलवाड, राजेश्वर सोमवंशी, अशोक पाटील, बाबूराव बोडके, विठ्ठल महागावे, विजयकुमार फुलसे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा, पेढे वाटून आनंद साजरा केला़ हरंगुळ बु़ : लातूर तालुक्यातील हरंगुळ बु़ येथे डॉ़ सुनील गायकवाड यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ काँग्रेसच्या पाठिशी सदैव असणार्‍या हरंगुळ येथून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाची मोठी लीड दिली आहे़ भाजपाचे कार्यकर्ते अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, काशीनाथ पांचाळ, गणेश सगर, बाबूराव कोतवाड आदींनी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला़ तसेच गुलालाची उधळणही केली़ थेरगाव : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे डॉ़ सुनील गायकवाड यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ भाजपाचे तालुका सचिव अशोक जाधव यांनी ५ किलो पेढे वाटले़ यावेळी भरत जाधव, संजय चामले, सुभाष मिटकर, धनराज सूर्यवंशी, डॉ़ शंकर सूर्यवंशी उपस्थित होते़ भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साह औसा - औसा तालुका हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे़ तालुक्यातील भादा महसूल मंडळातील २६ गावेही लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत़ तर १०३ गावे ही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत़ लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे डॉ़ सुनील गायकवाड तर उस्मानाबादमधून शिवसेनेचे प्रा़ रवींद्र गायकवाड विजयी झाले आहेत़ या दोन्ही मतदारसंघातील विजयाचा आनंद औसा शहर व तालुक्यातील शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची आतषबाजी करून साजरा केला़ यावेळी भाजपाचे किरण उटगे, सूर्यकांत शिंदे, महादेव कटके, गितेश शिंदे, बंडू कोदे्र, सुरेश भुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला़ भादा परिसरातही जल्लोष औसा : तालुक्यातील भादा गट हा लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे़ काँग्रेस पक्षाने भादा गटात मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणा राबविली होती़ त्या प्रमाणात भाजपाकडून मात्र प्रचाराकाळात हा पट्टा दुर्लक्षितच दिसत होता़ तरीही भाजपाचे विजयी उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना बर्‍यापैकी मते मिळाली़ डॉ़ गायकवाड यांच्या विजयानंतर भादा व परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला़ औसा शहर व तालुक्यातील भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर व उस्मानाबादमधील विजयी झालेल्या उमेदवारामुळे जल्लोष साजरा केला़ सारसा, टाकळगाव येथे आनंदोत्सव लातूर : तालुक्यातील सारसा, टाकळगाव येथे भाजपाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ सारसा येथे भाजपाचे तालुका सरचिटणीस बन्सी भिसे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला़ यावेळी सुनील भिसे, ओम भिसे, गुणवंत भिसे, अलीसाब पठाण, राजेसाब पठाण, गोविंद भिसे, राजाभाऊ भिसे आदींची उपस्थिती होती़ टाकळगाव येथे भाजपाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ यावेळी विनोद कदम, उमाकांत कदम, रामदास शिंदे आदींची उपस्थिती होती़