शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप लागला निवडणूक कामाला

By admin | Updated: January 4, 2016 01:33 IST

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला असून पक्षाच्या प्रदेशअंतर्गत संघटनात्मक

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला असून पक्षाच्या प्रदेशअंतर्गत संघटनात्मक निवडणुकांचे काम जोरात सुरू आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड दि. १६ रोजी होईल. सोमवार, दि. ४ पासून मतदारसंघ मंडळ समित्यांची निवड होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १,६00 पैकी १,२00 बुथवर समित्या स्थापन झाल्या आहेत. दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड १५ रोजी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात ४0 बुथ समित्या असतात. एका बुथवर १0 जणांची समिती असते. मतदारसंघातील बुथवरील ४00 पदाधिकारी मंडळ अध्यक्ष तसेच इतर ३0 मिळून ३१ जणांची निवड करीत असतात. ही प्रक्रिया आजपासून सुरू होत असून पहिला मंडळ अध्यक्ष सोमवारी सावर्डे मतदारसंघातून निवडला जाईल. दि. ५ रोजी साळगाव, पर्ये, मये आणि कुडचडे मतदारसंघात. दि. ६ रोजी थिवी, साखळी, मांद्रे व काणकोण मतदारसंघात. दि. ७ रोजी पेडणे, सांगे व हळदोणे मतदारसंघात मंडळ समित्यांची निवड होईल. या मंडळ समित्यांचा २0१६ ते २0१८ असा तीन वर्षांचा कार्यकाळ असेल. दि. १४ पर्यंत ही प्रक्रिया संपणार आहे. केंद्रातून त्यासाठी पक्षाचा खास निवडणूक अधिकारी येणार आहे. पक्षाचे गोवा प्रभारी पुरुषोत्तम रूपाला, संघटनप्रमुख बी. एल. संतोष, निवडणूक प्रमुख अविनाश खन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. (प्रतिनिधी)