शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

दक्षिणेत वर्चस्वासाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

By admin | Updated: October 23, 2015 02:03 IST

मडगाव : पालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून सांगे, कुंकळ्ळी व कुडचडे या तीन पालिकांवर भाजपाचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. मडगाव,

मडगाव : पालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून सांगे, कुंकळ्ळी व कुडचडे या तीन पालिकांवर भाजपाचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. मडगाव, काणकोण व केपे या तीन पालिका आपल्या सत्तेखाली आणण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक भाजपने आपल्या प्रतिष्ठेची केल्याने तिच्याकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. गुरुवारी दसऱ्याचा सण असतानाही मडगावात उमेदवार आणि नेत्यांनी प्रचारावर भर दिला. आमदार विजय सरदेसाई व दिगंबर कामत यांनी गुरुवारीही काही उमेदवारांसह घरोघरी फिरून प्रचार केला. तर भाजपाचे दामू नाईक हेही प्रचारात सक्रिय झाले होते. खासदार नरेंद्र सावईकर व प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही आपला मुक्काम दक्षिण गोव्यातच ठोकला होता. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रात्री उशिरा मडगावात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गोव्यातील ११ पैकी किमान ९ पालिकांवर भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. मडगाव व केपेतही भाजपाला अनुकूल वातावरण आहे, असे ते म्हणाले.मात्र, आमदार विजय सरदेसाई यांनी तेंडुलकर यांचा हा दावा खोडून काढताना काँग्रेस व अपक्ष आमदारांनी पुढे आणलेले मडगाव सिव्हीक अलायन्सचेच नगरमंडळ मडगाव पालिकेत स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत मडगावच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस गोटात आश्वस्त वातावरण असून २५ पैकी किमान १३ जागा ही आघाडी जिंकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र, भाजपप्रणित मडगाव विकास आघाडीचे निमंत्रक दामू नाईक यांनाही आपलेच पॅनल सत्ता स्थापन करेल असे वाटते. मात्र, मडगावात भाजपाला बंडखोरीचा बराच त्रास सहन करावा लागणार आहे. कुंकळ्ळीत सुरुवातीला भाजपाच्या विरोधात वातावरण होते. मात्र, काँग्रेसचेच नेते आपसात भांडत असल्यामुळे त्याचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सांगेत आमदार सुभाष फळदेसाई यांचा पाठिंबा असलेली आघाडी एखाद दुसरा अपवाद वगळता पूर्ण क्षमतेने सत्तेवर येण्याची शक्यता आहे. कुडचडेतही आमदार नीलेश काब्राल यांनी बऱ्यापैकी मांड ठोकल्याने याही पालिकेत भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)