शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वन खात्यातर्फे २७ ते २९ दरम्यान पक्षी महोत्सवाचे आयोजन

By समीर नाईक | Updated: January 15, 2024 15:31 IST

राज्यात जवळपास ४५० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. या पक्षांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी : वन खात्यातर्फे दि. २७ ते २९ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय ७ व्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पक्षी महोत्सव दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे.

 राज्यात जवळपास ४५० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. या पक्षांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वन खात्याकडून वर्षीच्या पक्षी महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू यानिमित्त पक्षी कार्यशाळा, पक्षी निरीक्षण यांसारखे कार्यक्रम होणार आहेत. पक्षी तज्ज्ञ, कलाकार यांचाही या महोत्सवात सहभाग असेल. महोत्सव प्रतिनिधीसाठी ३५०० रुपये आणि विद्यार्थी प्रतिनिधीसाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जातील, असे कळविण्यात आले आहे. 

यापूर्वी बोंडला अभयारण्य, मोले अभयारण्य, सलीम अली पक्षी अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य या सारख्या भागात पक्षी महोत्सवाचे यशस्वी आयोजन खात्यातर्फे करण्यात आले आहे. 

 विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम  या पक्षी महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम देखील वन खात्यातर्फे राबविले आहे. यामध्ये शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, तर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, आणि छायाचित्र स्पर्धा खुल्या गटात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असेही वन खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य