शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलातील दुकानांचे सांडपाणी उघड्या नाल्यात, कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:21 IST

गोव्यातील व्यापारी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगावातील सर्वात मोठे व्यापारी संकुल म्हणून ज्याची ओळख आहे. त्या ओशिया कॉम्प्लेक्समधील एकाही दुकानाला सांडपाणी वाहिनीची जोडणी नसल्याचे उघड झाले आहे.

मडगाव: गोव्यातील व्यापारी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगावातील सर्वात मोठे व्यापारी संकुल म्हणून ज्याची ओळख आहे. त्या ओशिया कॉम्प्लेक्समधील एकाही दुकानाला सांडपाणी वाहिनीची जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकल्पातील आस्थापनांचे सांडपाणी राजरोसपणे खुल्या गटारात सोडले जात असल्याचे उघड झाल्यानंतर मंगळवारी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी एकतर त्वरित सांडपाणी वाहिनीची जोडणी घ्या. अन्यथा या प्रकल्पातील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी सरदेसाई यांनी संबंधित अधिका-यांची बैठक बोलावली असून त्यात या प्रकल्पाच्या विकसकालाही बोलाविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, मडगाव नगरपालिका, नगर विकास व नियोजन प्राधिकरण तसेच सांडपाणी व्यवस्थापन अधिकारिणीच्या अधिका-यांशी यासंदर्भात चर्चा होणार आहे.मडगावात अगदी मध्यभागी असलेल्या आणि सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या या प्रकल्पात दोनशेपेक्षा अधिक व्यापारी आस्थापने असून या प्रकल्पाला सांडपाणी वाहिनीची जोडणी नसल्याने या सर्व दुकानांतील सांडपाणी जवळ असलेल्या खुल्या नाल्यात सोडत असल्याचे दिसून आल्यानंतर सरदेसाई यांनी मंगळवारी पहाणी केली. यावेळी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक व अन्य अधिकारीही उपस्थित होते.घाण  पाणी उघड्या नाल्यात सोडणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असून अशी मनमानी आम्ही चालवू देणार नाहीत असा सज्जड दम यावेळी सरदेसाई यांनी दिला. ते म्हणाले, या प्रकल्पाच्या विकसकाने सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत. मागची कित्येक वर्षे त्यांची मनमानी चालू आहे. मात्र यापुढे ती चालू देणार नाही. या प्रकल्पातील दुकानदारांना एका आठवड्याच्या आत सांडपाणी वाहिनीची जोडणी घ्यावीच लागेल. अन्यथा आरोग्य खात्याला कळवून या आस्थापनांतील पाण्याचा व वीजेचा पुरवठा बंद केला जाईल असे त्यांनी सांगितले.

पहाटे 2 वाजता पाण्याचा निचराया प्रकल्पातील आस्थापनांकडून दिवसभर सांडपाणी साठवून ठेवून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सगळीकडे सामसूम झाल्याचा फायदा घेऊन हे सांडपाणी खुल्या गटारात सोडून देत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी मडगाव पालिकेकडून या प्रकल्पाच्या जवळ असलेले कोलवा सर्कल जवळील वाहतूक बेट काढून टाकण्याचे काम पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होते. हे काम चालू असताना पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्या लक्षात हा प्रकार आला. नाईक यांनी त्वरित यासंदर्भातील माहिती नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांना दिली. त्यानंतर ही तपासणी झाली. पहाटेच्या दोनच्या सुमारास पंपिंगकरुन पाणी नाल्यात सोडले जाते असे लक्षात आले आहे. त्यामुळे एखादा झरा फुटावा त्याप्रमाणो हे सांडपाणी घसाघसा पहाटेच्या सुमारास नाल्यातून वाहत जात असल्याचे पालिका कर्मचा-यांच्या लक्षात आले होते. 

टॅग्स :goaगोवा