शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भर वस्तीतून राष्ट्रीय महामार्गावरील काम करण्यास भोम ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 16:38 IST

सरपंचाच्या कृतीचा केला निषेध, भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे.

अजय बुवा 

फोंडा - वाहतुकीची कोंडी होते म्हणून सरकारने भोम येथून नव्या रस्त्याची व उड्डाणपूल चे सोपस्कार करण्यासाठी हालचाली केल्या होत्या परंतु सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला आहे. गुरुवारी या संदर्भात सरपंचांनी पुढील सोपस्कार केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांच्या सदर कृतीचा निषेध केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नवीन रस्त्या संबधीत जे काही आराखडे समोर येत आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. मुळात आराखडा 2014 चा असताना जमीन अधिसूचित करण्याची प्रक्रिया मात्र आठ वर्षानंतर होत आहे.सदर  प्रकरण हे गोंधळात टाकणारे आहे .लोकांनी सातत्याने या संदर्भात विरोध केला आहे व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. तरीसुद्धा लोकांनी नाकारलेले आराखडे घेऊन प्रशासन पुढे येत आहे. ते आम्ही कदापी मान्य करणार नाही. सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी यासंदर्भात व्यवस्थित अभ्यास करायला हवा होता. परिणामी आमच्था लोकांची नाराजी  त्यांनी सुध्दा ओढवून घेतलेली आहे.

भोमची वाहतूक कोंडी सोडवायची असल्यास बायपास हा पर्याय आहे. जो सरकारला आम्ही वेळोवेळी सुचवला आहे. यावेळी एक गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार एका बांधकाम व्यवसायिकाने येथे प्लॉट्स निर्माण केले आहेत. सदर प्लॉट्स च्या ठिकाणी जाण्यास रस्ता नाही. सदरचे प्लॉट्स हे बेकायदेशीर आहेत .त्या प्लॉटच्या ठिकाणी जाण्याकरता रस्ता नाही तेव्हा भर वस्तीतील लोकांना तिथून हाकलून लावून नवीन रस्त्याच्या नावाखाली त्या बांधकाम व्यावसायिकाचे हित जपण्यासाठी सरकार काम करत आहे. ह्या संदर्भात आम्ही  न्यायालयात दाद मागणार असून कशाही परिस्थितीत हा रस्ता भर वस्तीतून करू दिला जाणार नाही.