शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईचे उगमस्थान भीमगड अभयारण्यालाही 10 कि. मी बफर झोन हवा

By admin | Updated: July 19, 2016 18:31 IST

कर्नाटकातील भीमगड अभयारण्यातून म्हादईचा उगम होत असल्याने या अभयारण्यालाही १0 किलोमिटरचा बफर झोन असावा, अशी मागणी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी

- गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे पंतप्रधानांना पत्र

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 -  कर्नाटकातील भीमगड अभयारण्यातून म्हादईचा उगम होत असल्याने या अभयारण्यालाही १0 किलोमिटरचा बफर झोन असावा, अशी मागणी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. म्हादईच्या पाण्याबाबत कर्नाटक गोवा व महाराष्ट्र यांच्यात वाद असून हे प्रकरण लवादाकडे सुनावणीस आहे. लवादाचे निर्बंध असतानाही कर्नाटकने कळसा भंडुरा कालव्यांचे काम चालूच ठेवले असल्याने गोवा सरकार नाराज आहे. मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, मान्सूनमध्ये म्हादई चार अभयारण्यातून वाहते आणि ही नदी गोव्याची जीवनवाहिनी आहे. गोवा सरकारने म्हादई अभयारण्याच्या परिसरात १ किलोमिटरचा बफर झोन जाहीर केलेला आहे. मात्र कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. लवादाला बगल देण्यासाठी कर्नाटकने सर्व नियम धाब्यावर बसवून वटहूकूम काढला. एकूणच या पायमल्लीमुळे पश्चिम घाटच धोक्यात आला आहे. म्हादईचे उगमस्थान असलेल्या भीमगड अभयारण्यालाही १0 कि . मी बफर झोन जाहीर करण्याचे निर्देश दिले जावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाडकर्णींच्या नियुक्तीचे समर्थन दरम्यान, म्हादई तंटा लवादासमोर गोव्याच्या वतीने आत्माराम नाडकर्णी हेच ज्येष्ठ वकील म्हणून बाजू मांडणार आहेत, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुढे खासदार प्रल्हाद जोशी यांनी नाडकर्णी यांच्या नियुक्तीवर केलेल्या टिकेचा समाचार घेतला आहे. ते पुढे म्हणतात की, नाडकर्णी यानी ११ वर्षे गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरलपद सांभाळले आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती होताच त्यानी अ‍ॅडव्होकेट जनरलपदाचा राजीनामा दिला व म्हादई प्रकरणात गोव्याची बाजू मांडण्यास असमर्थता दर्शविली परंतु हे संवेदनशील प्रकरण असल्याने आणि नाडकर्णी यांचा त्यावर सखोल अभ्यास असल्याने गोव्याची बाजू त्यांनीच मांडावी, असे राज्य सरकारला वाटते. खासदार नरेंद्र सावईकर यांनीही केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांना पत्र लिहून कर्नाटकचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी नाडकर्णी यांच्या नियुक्तीला केलेल्या विरोधाबद्दल नाराजी व्यक्त केली.