शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बालरथांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

By admin | Updated: March 3, 2017 01:48 IST

पणजी : गोव्यातील बालरथांवरील म्हणजे शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात

पणजी : गोव्यातील बालरथांवरील म्हणजे शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याची प्रक्रिया कदंब वाहतूक महामंडळाने सुरू केली आहे. मात्र, कदंब बसगाड्यांवर असलेली जाहिरात काढण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास आपल्याला भाग पाडण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती महामंडळाने गोवा राज्य महिला आयोगाला केली आहे.कदंबच्या बसगाड्यांवर आणि बालरथांवरही कंडोमच्या जाहिराती असून त्यात एका महिलेचेही आक्षेपार्ह छायाचित्र आहे. ही जाहिरात काढून टाकली जावी, अशी मागणी रणरागिणी या महिला संस्थेने काही दिवसांपूर्वी महिला आयोगास निवेदन सादर करून केली होती. आयोगाने तत्काळ मागणीची दखल घेऊन कदंब महामंडळास पत्र पाठविले व जाहिराती हटविण्याची सूचना केली. महामंडळास आयोगाचे पत्र काल गुरुवारी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथांवर कंडोमची जाहिरात असू नये, या सूचनेचे तत्काळ पालन करण्यासाठी महामंडळाने पावले उचलली. संबंधित जाहिरात कंपनीला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ती जाहिरात काढण्यास सांगितले व त्यासाठी कंपनीही तयार झाली. जाहिरात आपण तत्काळ हटवू, असे कंपनीने महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. दरम्यान, कदंबच्या अन्य बसगाड्यांवरील जाहिरात काढून टाकण्याची सूचना करण्यापूर्वी महिला आयोगाने महामंडळाचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले. कदंब बसगाड्यांवरील जाहिरात ही टीव्हीवरही झळकते व राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांवरही ती असते. शिवाय कदंब गाड्यांवर ती जाहिरात लावणे हे बेकायदा नव्हे, असा दावा घाटे यांनी केला आहे. (खास प्रतिनिधी)