शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा गोव्यात पार पडली; स्टेडीयमविषयी पूर्ण सहकार्य करण्याचे जय शहांचे आश्वासन

By समीर नाईक | Updated: September 25, 2023 19:57 IST

बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासोबत अध्यक्ष रॉजर बिन्नी, जीसीएचे सचिव रोहन गावस देसाई, व इतर बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

पणजी: भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) ९२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा राज्यातील वागातोर येथील डब्लू गोवा या तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा पार पडली. दरम्यान राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडीयम उभारण्याबाबत गोवा क्रिकेट संघटनेला (जीसीए) पूर्ण सहकार्य करु असे, ठोस आश्वासन यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहे.

या बैठकी दरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासोबत अध्यक्ष रॉजर बिन्नी, जीसीएचे सचिव रोहन गावस देसाई, व इतर बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे येथे एक स्टेडीयम व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. जीसीएने स्टेडीयमसाठी आवश्यक सर्व काही प्रक्रीया पूर्ण कराव्यात, बीसीसीआय त्यांना स्टेडियम उभारण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळी दिली.

बीसीसीआयची वार्षीक सर्वसाधारण सभा गोव्यात झाली, त्या निमित्ताने येथे बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले होते. यावेळी बीसीसीआयचे सचीव जय शहा, व अध्यक्ष रॉजर बिन्नी हेही उपस्थित होते. यांच्याकडे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमचा विषय मांडला असून, त्यांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. आमच्याकडे स्टेडीयमबाबत जी प्रक्रीया पूर्ण करायची राहीली आहे, ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु, असे यावेळी जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी सांगितले.

 हे होते सभेतील महत्वाचे मुद्दे... - लोकपाल आणि आचार अधिकाऱ्यांची नियुक्ती- ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा समारोप.- नियम २६ आणि २५ मध्ये नमूद केल्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी), तसेच क्रिकेट समित्या, स्थायी समिती आणि पंच समितीवर बीसीसीआय प्रतिनिधींची नियुक्ती.- भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) एका प्रतिनिधीचा आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये समावेश करणे.- २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी खजिनदाराच्या अहवालाची स्वीकृती, तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अंदाजपत्रक स्वीकारणे.

 स्टेडियम उभारणीबाबतचा अधिकार फक्त जीसीए आणि सरकारकडे: 

बीसीसीआयची वार्षिक आमसभा राज्यात झाली ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण आंतरराष्ट्रीय स्टेडीयमबाबत सर्व अधिकार आणि निर्णय जीसीए आणि राज्य सरकारच घेणार आहेत. बीसीसीआय स्टेडीयम उभारुन देऊ शकत नाही, ते फक्त आर्थिक मदत करु शकतात. आणि आर्थिक मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके यांनी सांगितले.

यापूर्वी देखील जीसीएने बीसीसीआयकडे स्टेडियमचा विषय मांडला होता, तेव्हा देखील त्यांनी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन जीसीएला दिले होते, त्यामुळे यात काही नविन नाही. शेवटी निर्णय जीसीए आणि सरकारला घ्यायचा आहे. स्टेडीयमसाठी जागा निश्चित करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रीया झाल्यावरच बीसीसीआय आर्थिक मदत करणार आहे, असेही फडके यांनी यांनी सांगितले.

टॅग्स :BCCIबीसीसीआय