शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम स्कीमर विरोधी करा पोलिसांची बँकाना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:54 IST

एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी करण्याच्या सूचना गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना केल्या आहेत. अलिकडे घडलेल्या स्कीमिंगच्या प्रकरणाचा धसका घेऊन पोलिसांकडून बँकांना ११ महत्त्वपूर्ण सूचनां करण्यात आल्या आहेत. 

पणजी: एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी करण्याच्या सूचना गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना केल्या आहेत. अलिकडे घडलेल्या स्कीमिंगच्या प्रकरणाचा धसका घेऊन पोलिसांकडून बँकांना ११ महत्त्वपूर्ण सूचनां करण्यात आल्या आहेत. एटीएम मशीन्सना स्कीमर बसवून खातेदारांची गोपनीय माहिती चोरण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलिसांनी बँकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी असावीत, स्कीमर बसविलेला असल्यास पाहाणी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी बँक अधिकाºयांनी एटीएम केंद्रात जावे, लाठीधारी सुरक्षा रक्षक चोविस तास ठेवावा व त्याच्याकडे धोक्याची सूचना देणारा अलार्म असावा, एटीएममध्ये प्रवेश करणाºयाचा आणि बाहेर पडणाºयाचा चेहरा टीपण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमरे रात्रीच्या काळोखातही छायाचित्रे टीपणारे असावेत, स्थानिक बँक व्यवस्थापक फोनवरून संपर्क करण्यासाठी २४ तास उपलब्ध असावा. सुरक्षा रक्षक हे नोंदणीकृत एजन्सीकडूनच नेमले जावेत, एटीएममशीनमध्ये पैसे घालणाºया एजन्सीकडून पैसे घालतानाच अतिरिक्त एटीएम कार्डरीडर वगैरे बसविलेला असल्यास तपासून पाहावे अशा या सूचना आहेत. अलिकडेच एटीएम मशीनमध्ये स्कीमर लावणाºया एका विदेशी माणसाला पणजी पोलिसांनी अटक केली होती.