शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाबू गावकरने मिळवून दिले गोव्याला पाहिले सुवर्ण पदक, वाढदिवसाच्या दिवशीच साधली किमया

By समीर नाईक | Updated: October 26, 2023 15:36 IST

सदर स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. लेझर रन प्रकारात ६०० मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता.

पणजी: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला गुरुवारी पहिले पदक प्राप्त झाले आहे. गोव्याच्या बाबू अर्जुन गांवकर याने मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळात पुरुषांच्या लेझर रन प्रकारात सुवर्ण पदक मिळवीत पदक तलिकेचा शुभारंभ केला. बाबू गांवकर याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पदक मिळवून स्वतःलाच वाढदिवसाचे अविस्मरणीय गिफ्ट दिले आहे.

सदर स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. लेझर रन प्रकारात ६०० मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. या दोन्ही गोष्टी सांभाळून नेत्रावळी-सांगे येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय बाबू गावकर याने हे यश मिळविले आहे. बाबुचे वडील हे मेकॅनिक आहे. कठीण परिस्थितीत बाबू याने धावण्याचा आणि शूटिंगचा सराव करत हे पदक मिळविल्यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. 

बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे. यापूर्वी त्याने महाविद्यालयीन स्तरावर मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉनमध्ये भाग घेत पदके मिळविली होती. बाबूने आपल्या या यशाचे श्रेय आपले आई वडील व प्रशिक्षक निलेश नाईक याला दिले. 

 फळदेसाई कुटुंबियांकडून कडून बाबुला १ लाख रुपये जाहीर (चौकट करणे) सांगेचे आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या कुटुंबाकडून बाबू गांवकर याला गोव्याला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल १ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या गोमंतकीय खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यातून त्याला व इतर खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असे फळदेसाई यांनी सांगितले. क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी बाबुचे अभिनंदन केले. 

टॅग्स :goaगोवाGold medalसुवर्ण पदक