शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी घेत खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे; मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

By समीर नाईक | Updated: October 19, 2023 14:53 IST

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

पणजी: ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे बहुप्रतिक्षित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गुरुवारपासून बॅडमिंटन खेळाने सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, ताळगावच्या आमदार जेनिफर मोंसेरात, वस्कोचे आमदार कृष्णा साळकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अमिताभ शर्मा, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालक डॉ. गीता नागवेंकर,जिल्हा पंचायत सदस्य शायनी डी ऑलिव्हेरा आणि सांताक्रुझच्या सरपंच जेनिफर डी ऑलिव्हेरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रिय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे स्वप्न अखेर खरे झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तयारी करत होतो, अखेर तो दिवस उजाडला आहे.  एक ध्येय, एक ध्येय हे लक्षात घेत २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या स्पर्धेचा अधिकृत उद्घटन होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने खेळाडूंमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे. आम्ही अमच्यातर्फे सर्वोच्च प्रदान केले आहे. देशभरातील खेळाडूंनी या मिळालेल्या व्यासपीठाचा वापर करून आपले कौशल्य विकसित करावे, तसेच भविष्यात होणाऱ्या आशियायी स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत, देशासाठी पदके मिळवून देण्यावर भर द्यावा, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

देशासाठी आणि गोव्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. देशभरातील क्रीडापटू, अधिकारी, प्रतिनिधी यांचे मी राज्याच्या वतीने स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहे. त्यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जागतिक स्तरावर स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहे.  एक उत्कृष्ट दृष्टी मिळाली आहे आणि प्रत्येक खेळाडूला यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याच मारगदर्शनाखाली आम्ही योग्य रित्या पुढे जात आहोत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की क्रीडा क्षेत्रात आमचा देश पुढे जात आहे, असे क्रीडामंत्री  गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, ताळगावच्या आमदार जेनिफर मोंसेरात, व वस्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बॅडमिंटन खेळून आपले कौशल्य दाखवून दिले. तसेच ३७ व्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे शुभंकर असलेल्या मोगा यांनी उपस्थिती लावल्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळाला. नंतर याच ठिकाणी बॅडमिंटन क्रीडा प्रकारच्या सामन्यांना सुरुवात झाली. गोव्याचा संघ खेळत असल्याने प्रेक्षकांनी देखील बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल उंचावले.