शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक तरी मंत्रिपद आरपीआयला द्याच, लोकसभेसाठीही दोन जागा हव्यात - रामदास आठवले

By किशोर कुबल | Updated: October 10, 2023 14:13 IST

महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पणजी : महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

गोवा भेटीवर आलेले आठवले यानी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान दिले जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे, असे ते म्हणाले. पाचही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीची सत्ता येईल तसेच लोकसभा निवडणुकीतही एनडीएला ३३० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

आठवले म्हणाले कि,‘ विरोधकांना ‘इंडिया’  नाव घेण्याचा अधिकार नाही. इंडिया आमचा देश आहे. ‘इंडिया’च्या नावाने निवडणूक लढवू नये.आठवले म्हणाले की, केंद्रात मोदी सरकारने गेल्या सव्वा नऊ वर्षांच्या काळात अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. सर्वसामान्य लोकांना बॅंक खाते म्हणजे काय हे ठाऊक नव्हते.  ५० कोटी ५५ लाख ७४ हजार लोकांची बॅंक खाती उघडली. गोव्यात २ लाख १ हजार खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ३२.५ कोटींपेक्षा अधिक कर्ज देशभारत गरजूंना मिळाले. ९ कोटी ५८ लाख लोकांना देशभरात गॅस सिलिंडर दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून गोव्यात ३००० लोकांना घरे दिली.’

आठवले यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे समर्थन केले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या निवडणुका घेतल्याने हजारो कोटी रुपये खर्च होतात. मोदींजींना वाटते एकाचवेळी निवडणुका व्हाव्यात परंतु ते कितपत शक्य आहे सांगता येत नाही. संसदेत कायदा करावा लागेल.’ महिला आरक्षण कायदा हे मोदीजींचे क्रांतिकारक पाऊल आहे. पत्रकार परिषदेस आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेgoaगोवा