शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अश्पाक बेंग्रेचा कारागृहात खून

By admin | Updated: July 27, 2016 02:05 IST

बार्देस : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला.

बार्देस : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अश्पाकवर हल्ला करून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेला विनायक कारबोटकर याला अटक करण्यात आली आहे. खून, प्राणघातक हल्ले, अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी उकळणे यासारख्या अनेक गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अश्पाकला जामिनाच्या कालावधीत वाढ करण्यासाठी न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याला ठार करण्यात आले. तत्पूर्वी त्याला जबर मारहाणही झाली असावी, असा कयास आहे. मारहाणीचे व्रण त्याच्या तोंडावर, हातावर, गालावर, पाठीवर तसेच अंगावर अनेक ठिकाणी उमटले होते. ही मारहाण तुरुंगातील अंतर्भागात झाली, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागात त्याचा खून करण्यात आला. अश्पाकचा खून कोणत्या हत्याराने झाला, याबद्दल तुरुंग प्रशासन आणि पोलीसही मूग गिळून गप्प असले, तरी कागद कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६ इंच लांबीच्या धारदार कटरने अश्पाकचा गळा चिरण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेनंतर लगेच अश्पाक याला म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)