शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात गोव्याच्या दौऱ्यावर

By admin | Updated: July 21, 2016 19:02 IST

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे येत्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात गोवा भेटीवर येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २१  : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे येत्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात गोवा भेटीवर येणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री बनल्यानंतरची केजरीवाल यांची ही तिसरी गोवा भेट असेल. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आपला सापडले त्याच धर्तीवर गोव्यात एखादा प्रभावी चेहरा सापडतो का याचा शोध आम आदमी पक्ष घेत आहे.

केजरीवाल हे वारंवार गोव्यास भेट देऊन नव्या चेह:यांचा शोध घेत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी लोकांसमोर आपचा प्रभावी नेता म्हणून सादर करण्यासाठी एखादा नवा चेहरा सापडतो का हे केजरीवाल यांच्यासह पंकज गुप्ता व आशूतोष तसेच दिनेश वाघेला हे आपचे राष्ट्रीय नेतेही पाहत आहेत. आपचा प्रभाव राज्यातील स्तीबहुल मतदारसंघांमध्ये वाढत आहेत. काँग्रेस व भाजपच्याही ताब्यातील काही मतदारसंघांना आम आदमी पक्षाने लक्ष्य बनविले आहे.

निवडणूक कुठच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी याचे उत्तर आपला अजून सापडलेले नाही. डॉ. ऑस्कर रिबेलो यांच्यासाठी आम आदमी पक्षाने खूप प्रयत्न करून पाहिले. निवडणूक प्रचारावेळी रिबेलो, ज्येष्ठ पर्यावरणवादी क्लॉड अल्वारीस हे आपसाठी सक्रिय होतील पण रिबेलो यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपच्या नेत्यांना अन्य चेह:यांचा शोध घ्यावा लागत आहे. काँग्रेस किंवा भाजपमधून निमंत्रण देऊन बोलवावा असा सिद्धूसारखा विश्वासार्ह असा कुणी नेता गोव्यात अजून आम आदमी पक्षाला सापडलेला नाही.

केजरीवाल यांनी यापूर्वी दोनवेळा गोव्यास भेट दिली. त्यांच्या जाहीर सभेस प्रचंड प्रतिसाद लाभला होता. विविध समाज घटकांशी बोलून जनमत अजमविण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी दुस:यांदा गोव्यास दिलेल्या भेटीवेळी केला. गोवा संवाद उपक्रमही केजरीवाल यांच्या उपस्थितीत सुरू झाला आहे. युवा, महिला व अन्य घटकांशी आपचे नेते आता संवाद साधण्याचे कार्यक्रम अनेक ठिकाणी करत आहेत. या संवादातून आम आदमी पक्षाचा निवडणूक जाहीरनामा ठरणार आहे.दरम्यान, आपच्या गोवा शाखेच्या मिडिया विभागाचे प्रमुख रुपेश शिंक्रे यांनी सांगितले की, येत्या महिन्यात युवकांशी संवाद साधण्याचा केजरीवाल यांचा आणखी एक कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. यापूर्वी फोंडय़ात युवकांशी संवादाचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला.