शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम मत्स्यदुष्काळ संपला

By admin | Updated: May 15, 2015 01:20 IST

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा

मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छीमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी (दि. १४) मच्छीमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फुर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छीमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छीमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केली. वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक श्ोखर प्रभुदेसाई पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, मालवणचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छीमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, साहाय्यक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रवीकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छीमार संघटनांचे व मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते. मालवणच्या मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छीमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छीमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छीमारांना त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला.गोव्यातील बोटींनी पारंपरिक मच्छीमारांचे क्षेत्र आबाधित ठेवून कुठेही मासेमारी करावी, असे मालवण येथील मच्छीमारांनी सूचवले. महाराष्ट्रात ४८ हजार मॅट्रीक टन मासळीची कपात झाल्याचा दावा महाराष्ट्रातील मच्छीमारांनी केला. याला महाराष्ट्रातील मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मालवणला जी घटना घडली ती अमानवीय होती. गोव्यातील बोटीवर हल्ला करण्याचा अधिकार मालवणच्या मच्छीमारांना नव्हता. शिवाय खलाशांना मारहाण करून बोटीची नासधूस करणे हे गैर असल्याचे फुर्तादो यांनी या वेळी सांगितले. समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी या वेळी मालवण व गोव्यातील मच्छीमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छीमारांमध्ये सौहर्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पोलीस उपाधीक्षक विजय खरात यांनी केले.