शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून पैसे पळविणाऱ्या चौकडीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 02:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : एटीएममधून कुंकळ्ळी येथील एकाच्या खात्यातील २0 हजार रुपये काढणाऱ्या चौकडीला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : एटीएममधून कुंकळ्ळी येथील एकाच्या खात्यातील २0 हजार रुपये काढणाऱ्या चौकडीला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांपैकी तिघेजण मूळ मुंबईचे, तर एकटा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे. गोव्यात ते सहलीसाठी आले होते. इरफान खान (२७), लायक अली खान (२१), शफद अली (३९) व अजितेश कुमार (२९) अशी संशयितांची नावे आहेत. यातील अजितेश वगळता अन्य संशयित मुंबई येथील आहेत. भादंसंच्या ४२0 कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. फ्रेडी जुझे फर्नांडिस (३७) हे तक्रारदार आहेत.बुधवारी दुपारी ही घटना घडली. पांझरकणी-कुंकळ्ळी येथील फ्रेडी हे पैसे काढण्यासाठी दांडेवाडी-कुंकळ्ळी येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम कार्ड केंद्रात गेले होते. कार्ड मशिनमध्ये घालून त्यांनी पिनकोड क्रमांक टाकला. मात्र, रक्कम मशिनमधून येत नसल्याने ते माघारी फिरकले. याचवेळी या एटीएम केंद्रात संशयितही आले होते. फे्रडी हे या केंद्रातून बाहेर गेले खरे; मात्र त्यांच्या एटीएम कार्डसंबंधीची प्रक्रिया मशिनमध्ये सुरूच होती. मशिनमधून दहा हजार बाहेर आल्यानंतर संशयितांनी ते काढून आपल्याकडे ठेवले. काही वेळाने फे्रडी यांना मोबाईलवरून दहा हजार रक्कम खात्यातून वजा झाल्याचा मेसेज आला.फे्रडी हे नंतर बँक आॅफ बडोदा शाखेच्या एटीएम कार्ड केंद्रात गेले. संशयितही त्याच्या पाठोपाठ तेथे पोहोचले. तेथेही फ्रेडी यांना हाच अनुभव आला. संशयाची पाल मनात चुकचुकल्याने फ्रेडी यांनी संशयितांच्या कारचा क्रमांक टिपून घेतला. नंतर कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांना कारचा नंबर पाठवून दिला असता, काणकोण येथे ही कार पोलिसांना सापडली. संशयितांना ताब्यात घेऊन नंतर कुंकळ्ळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर कुंकळ्ळी पोलिसांनी या संशयितांना अटक केली. पुढील पोलीस तपास चालू आहे.